शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत पावसाचे ‘थैमान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:19 IST

कानठळ्या बसविणाºया मेघगर्जनेसह बुधवारी दुपारनंतर पावसाने संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार तडाखा दिला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने तीन तास थैमान घातल्याने शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचले. घरे आणि दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले.

ठळक मुद्देतीन तासांत ५३.२ मि.मी. पाऊस घरे-दुकानांमध्ये पाणी

औरंगाबाद : कानठळ्या बसविणाºया मेघगर्जनेसह बुधवारी दुपारनंतर पावसाने संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार तडाखा दिला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने तीन तास थैमान घातल्याने शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचले. घरे आणि दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले. मुकुंदवाडी येथील अंबिकानगर भागात मुलगी वाहून गेल्याची घटना घडली तर अनेक ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. चिकलठाणा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत ५३.२ मि. मी. पावसाची नोंद झाली.साधारण ३.४५ वाजता विद्यापीठ आणि हर्सूल तलाव परिसरात पावसाला सुरुवात झाली. हळूहळू शहराकडे वाटचाल करीत साडेचार वाजेपर्यंत संपूर्ण शहराला जोरदार पावसाने घेरले. सुमारे तीन तास चाललेल्या पावसात संपूर्ण शहर धुवून निघाले. पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की, बघता बघता शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचून गेल्या बुधवारची पुनरावृत्ती झाली. गारखेडा परिसर, सिडको परिसर,  नूर कॉलनी, टाऊन हॉल, चिश्तिया चौक, जळगाव रोडवरील काळा गणपती, जयभवानीनगर, प्रतापनगर, हर्सूल, विद्यापीठ, टाऊन हॉल, सिटीचौक, बुढीलेन, बेगमपुरा, पोलीस आयुक्तालय, मोतीकारंजा, अंगुरीबाग, सावरकर चौक, बंजारा कॉलनी, एमजीएम परिसर, रोशनगेट, सिल्लेखाना चौक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन रोड, जिन्सी , सातारा परिसर, सिडको, लेबर कॉलनी, मयूर पार्क, उस्मानपुरा, औरंगपुरा, ज्योतीनगर, क्रीडा संकुल, मौलाना चौक, त्रिमूर्ती चौक, चेतक घोडा, बीड बायपास, अशा सर्वच भागांत पाण्याचे डोह तयार झाले.अग्निशमन विभागाला २५ फोनमुसळधार पावसामुळे सायंकाळपासून अग्निशमन विभागाचा फोन खणखणण्यास सुरुवात झाली. या तीन तासांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले म्हणून मदतीसाठी सुमारे २५ पेक्षा जास्त फोन आले. विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सर्वत्र पावसाचा परिणाम जाणवला; परंतु टाऊन हॉल आणि नूर कॉलनी या परिसरात सर्वाधिक फटका बसला. तसेच दिवाण देवडी रस्त्यावर आणि जळगाव रोडवरील काळा गणपती परिसरात भिंत कोसळली. पथकाच्या सर्व गाड्या लोकांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या.युरिया खताची शेकडो पोती भिजलीशहरात बुधवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसात रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर युरिया खताची शेकडो पोती भिजली. पोती पावसाने भिजू नये म्हणून हमालांनी मोठी धावपळ केली. परंतु अनेक पोत्यांमधील युरियाचे पाणी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.रेल्वेस्टेशनवर दोन मालगाड्यांद्वारे अनुक्रमे २५०० आणि १८०० टन युरियाची पोती मालधक्क्यावर दाखल झाली होती. ही पोती मालधक्क्याच्या परिसरात उतरविण्यात आली होती. पावसाचा अंदाज असूनही पोती ताडपत्रीने झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे सायंकाळी पावसाला सुरुवात होताच हमालांची एकच धावपळ सुरू झाली. पोत्यांच्या ढिगारावर ताडपत्री टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तोपर्यंत अनेक पोती भिजली.