शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

‘त्या’ शिक्षकांची वेतनवाढ रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:12 IST

संदिग्ध प्रमाणपत्रे व चुकीचे अंतर टाकून बदल्यांचा लाभ घेतलेल्या शिक्षक, शिक्षिकांना अपात्र ठरविले होते. त्यांना आता एक वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी तसे संकेत दिल्याने शिक्षकांत घाबरगुंडी उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : संदिग्ध प्रमाणपत्रे व चुकीचे अंतर टाकून बदल्यांचा लाभ घेतलेल्या शिक्षक, शिक्षिकांना अपात्र ठरविले होते. त्यांना आता एक वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी तसे संकेत दिल्याने शिक्षकांत घाबरगुंडी उडाली.हिंगोली जिल्ह्यात पाच टप्प्यांमध्ये जवळपास अडीच हजार शिक्षक बदलीपात्र होते. यापैकी दीड हजारांच्या आसपास शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यापैकी काही शिक्षकांनी संवर्ग १, २ चा लाभ घेताना विविध प्रमाणपत्रे जोडली होती. त्यांची काटेकोर तपासणी झाली. तर पती-पत्नी एकत्रिकरणातही काहींनी पती व पत्नीच्या शाळेतील अंतर चुकीचे टाकले. ते ३0 किमीपेक्षा जास्त असणे अपेक्षित होते मात्र कमी आढळले. जि.प.च्या आरोग्य विभागाकडून प्रमाणपत्रे तर बांधकाम विभागाकडून हे अंतर आधीच निश्चित करून घेतलेले होते. त्यामुळे या दोन्ही कारणांनी २0 जण थेट अपात्र ठरले. तर २१ जणांचे प्रमाणपत्र आॅनलाईन करण्यासाठी व फेरतपासणीस आरोग्य बोर्डाकडे पाठविले. याला महिन्याची मुदत दिली. या वेळेत ते न आल्यास अपात्र ठरण्याची भीती आहे.अपात्र ठरलेल्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत काय निर्णय होईल, हे आताच सांगता येणार नाही. मात्र त्यांना शिक्षा म्हणून एक वेतनवाढ रोखण्यात येईल, असे संकेत शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिले आहेत. त्यामुळे केवळ बदली रद्द होईल, पुढे नवीन ठिकाण मिळेल, असे वाटणाऱ्या शिक्षकांना हा नवा हादरा बसणार आहे. याबाबतही आता अनेकजण विचारणा करीत असून गूगल मॅप व इतर बाबींचा दोष सांगत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद