शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवोदयच्या ‘त्या’ शिक्षकाचीही बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:29 IST

येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थिंनींशी गैरवर्तन प्रकरणातील दुसऱ्या एका शिक्षकालाही तडकाफडकी नौशारी (गुजरात) येथील नवोदयमध्ये जोडण्यात आले आहे. यापूर्वी एकास कच्छ (गुजरात) येथे पाठविले. नवोदय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, ही प्राथमिक कारवाई असल्याचे वृत्त आहे. लोकमतने सदर प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुराव केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थिंनींशी गैरवर्तन प्रकरणातील दुसऱ्या एका शिक्षकालाही तडकाफडकी नौशारी (गुजरात) येथील नवोदयमध्ये जोडण्यात आले आहे. यापूर्वी एकास कच्छ (गुजरात) येथे पाठविले. नवोदय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, ही प्राथमिक कारवाई असल्याचे वृत्त आहे. लोकमतने सदर प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुराव केला.वसमत नवोदय विद्यालयात कार्यरत शिक्षक जी.एस. उमाटे व ए.व्ही. तायडे या दोन शिक्षकांनी विद्यालयातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. सदर मुलींनी प्राचार्यांकडे लेखी तक्रारी दिल्या. प्राचार्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलिसांनी प्रकरणास गांभीर्याने घेतले नाही. प्रकरण मिटवण्यासाठी स्थानिकचे अनेक दलालही सक्रिय झाल्याची चर्चा आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा पाठपुरावा करताच प्रशाससनाने गांभीर्याने दखल घेत या प्रकरणातील शिक्षक ए. व्ही. तायडे याची कच्छ (गुजरात) येथे तडकाफडकी रवानगी केली. तर दुसरा शिक्षक जी.एस.उमाटे यांच्यावरही बदलीची कारवाईचे पत्र रविवारी धडकले. उमाटे ची बदली नौशारी (गुजरात) नवोदयमध्ये केल्याचे पत्रात नमूद आहे. मात्र उमाटे हजर नसल्याने बदलीचे पत्र त्यांच्या घराच्या दरवाजावर लावण्यात आले आहे.विद्यार्थिनींशी गैरवर्तन करून शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. या प्रकरणात आरोपी कारवाईसाठी समोर येण्याऐवजी काही दलाल गैरवर्तन करणाºया शिक्षकांच्या बाजूने उभे राहत असल्याचा किळसवाना प्रकारही पहावयास मिळत आहे. रविवारी दिवसभर पालकांची गर्दी नवोदयमध्ये होती. अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली व ‘लोकमत’ ने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. प्राचार्य लक्ष्मणन् यांच्याशी संपर्क साधला असता नवोदय प्रशासनाने दोन्ही शिक्षकांना तडकाफडकी गुजरात राज्यातील नवोदयमध्ये अटॅचची कारवाई केली आहे. पुढील चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम कारवाई प्रशासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.