लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जून रोजी शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांशी सकाळी ९.३0 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.पंतप्रधान मोदी यांच्या या उपक्रमाबद्दल प्रशासनाला दोन दिवसांपूर्वीच पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांना पाचारण केले जाणार आहे. यात सहभागी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नेमके काय जाणून घेतील, याबाबत लाभार्थ्यांत उत्सुकता आहे.
घरकुल लाभार्थी साधणार पंतप्रधानांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:24 IST