शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

वाघ असल्याच्या चर्चेने कौठ्यात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:48 IST

वसमत तालुक्यातील कौठा, मोहगाव, बोराळा, धामणगाव परिसरात सध्या वाघाची दहशत पसरली असून, वाघ असल्याच्या चर्चेने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकौठा परिसरात ग्रामस्थ हैराण : वनविभागाला आढळली तडसाची पिले

लोकमत न्यूज नेटवर्ककौठा: वसमत तालुक्यातील कौठा, मोहगाव, बोराळा, धामणगाव परिसरात सध्या वाघाची दहशत पसरली असून, वाघ असल्याच्या चर्चेने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या या परिसरात सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात एक वाघ बकरीला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ वसमत परिसरातील असल्याची चर्चा असल्याने आणखी भीती वाढली आहे. कौठा परिसरातील कौठा, बोराळा, मोहगाव व धामणगाव येथे तर शेतकरी भीतीच्या पोटी रात्री शेतात जाण्यास घाबरत आहे.मोहगाव येथे ऊस तोडणी करणाºया कामगारांनी रात्रीच्या वेळी वाघ बघितल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या परिसरात तीन शेळ्या वाघाने फस्त केल्याची अफवाही जोरात पसरत असून, त्यास शेतकरी मात्र दुजोरा देत आहेत.याबाबत बोराळा येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. गवई यांनी सांगितले की, शेतकºयांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात जावून पाहणी केली असता हिंस्र पशुनेच या शेळ्या फस्त केल्याचे प्रथमदर्शनी सांगितले. या सर्व प्रकाराबाबत प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी, वसमत यांच्या कार्यालयात जावून चौकशी केली असता सदरील कार्यालयातही याबाबत माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. तसेच वनपाल रूमाले हे पथकासह दोन दिवसांपासून या परिसरात शोध घेत आहेत.मोहगाव परिसरात बिबट्याच्या काही खुणा व ठसे आढळून आले असल्याचे सांगितले. तसेच वाघ किंवा बिबट्या हा एका रात्रीत सरासरी ४० मैल अंतर चालू शकत असल्यामुळे एकाच ठिकाणी असण्याची शक्यता फार कमी असल्याचेही सांगितले.याबाबत वसमतचे वनपरिक्षेत्र अधिकारी जे.डी. कच्छवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याबाबत वनविभागाकडून माहिती घेण्यात येत असून मागील चार दिवसांपूर्वी या परिसरात ‘तडस’ या हिंस्त्र प्राण्याची काही पिल्लं सापडली आहेत व परिसरात वाघ, बिबट्या की इतर हिंस्र पशु आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.तो वाघाचा व्हिडीओ खोटा आहे- वाबळेहिंगोली जिल्ह्यात वाघ आल्याचा जो व्हिडीओ सोशल मिडिया, व्हॉट्सअ‍ॅवर फिरतो तो मुळात चुकीचा आहे. त्यावर कोणीती विश्वास ठेवू नये, तसेच वाघासाठी ५ ते ७ हजार हेक्टर जंगल असणे अपेक्षित आहे. शिवाय तेथे सर्व प्रकारचे प्राणी असणे गरजेचे आहे. हिंगोली जिल्ह्यात २९ हजार हेक्टर जंगल आहे. मात्र इतर प्राणी नसल्याने वाघ येथे राहुच शकत नाही. मात्र जिल्ह्यात तीन बिबटे आहेत. त्यांनाही काही घाबरण्याचे कारण नाही. एवढेही करुन बिबट्या आढळलाच तर वन विभागाशी संपर्क साधावा काही वेळात त्या गावामध्ये वनविभागाचे कर्मचारी दाखल होऊन बिबट्याला शोधून काढतील, असे विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.