शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
2
चीनची 'पॉवर परेड'! अण्वस्त्रे, समुद्री ड्रोन आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे
3
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा
4
पुतिन-जिनपिंग अन् किम यांचं अमेरिकेविरोधात षडयंत्र; चीनमधील परेड पाहून डोनाल्ड ट्रम्प संतापले
5
फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर
6
"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
7
ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा
8
"एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर...", श्रीकांत शिंदे आरक्षणाच्या निर्णयावर काय बोलले?
9
६० कोटी घोटाळ्याचा आरोप, शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय! मुंबईतील 'बॅस्टियन' रेस्टॉरंटला लागणार कुलूप
10
Maharashtra Accident: मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; कारचा भीषण अपघात, तिघे ठार
11
Virat Kohli Fitness Test : कोहलीसाठी कायपण! BCCI नं परदेशातच घेतली फिटनेस टेस्ट?
12
बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले...
13
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
14
मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना स्वामींचे स्मरण करता की नाही? ‘असा’ आहे कालातीत ऋणानुबंध
15
Mark Mobius Prediction: चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
16
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
17
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
18
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
19
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
20
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार

हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या दौ-यात ‘दे धक्का’ची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:36 IST

पालकमंत्री दिलीप कांबळे दौ-यावर आले म्हणजे एरवी भाजपकर झाडून-पुसून स्वागताला हजर राहतात. यावेळी परिस्थिती वेगळी होती. पालकमंत्री कुणाला तरी बळ देण्याचे काम करीत असल्याची भावना बळावत चालल्याने आमदारांसह कार्यकर्तेही विश्रामगृहाकडे फिरकले नाहीत.

ठळक मुद्देदुरावा निर्माण होण्याची चिन्हे : एकाला बळ, दुसºयाची नाराजी, भाजपकरही झाले हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे दौ-यावर आले म्हणजे एरवी भाजपकर झाडून-पुसून स्वागताला हजर राहतात. यावेळी परिस्थिती वेगळी होती. पालकमंत्री कुणाला तरी बळ देण्याचे काम करीत असल्याची भावना बळावत चालल्याने आमदारांसह कार्यकर्तेही विश्रामगृहाकडे फिरकले नाहीत. तर काहींनी हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचे रसभरीत वर्णन करीत आज दिवसभर मनोरंजन केले.पालकमंत्री दिलीप कांबळे हे नव्यानेच येथे आले तेव्हा भाजपचे युवा नेते रामरतन शिंदे हे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांनी शिंदे यांना चांगलेच फटकारले होते. त्यानंतर शिंदे हे भाजप सोडण्याच्या मानसिकतेत होते. मात्र नंतर त्यांचे पालकमंत्र्यांशी सूर जुळाले. शिंदे यांच्या पत्नी संगीता या जि.प.ला निवडून आल्या अन् पालकमंत्र्यांना शिंदे यांच्या ताकदीचा अंदाजही आला म्हणून की काय ते अधिक विश्वासू बनले. त्याचदरम्यान जिल्ह्यातील इतर पक्षाच्या आमदारांनी पालकमंत्री कांबळे यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले. तेव्हा आ.मुटकुळे यांची भूमिका संदिग्ध वाटत असल्याचा संशय कांबळे यांना आला. मात्र कांबळे यांनी मुटकुळे यांच्याशी संबंधात तसूभरही फरक पडू न देता शिंदे यांच्यामागे बळ उभे करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावत आहेत.शिंदे यांनी आयोजित केलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमासही मंत्र्यांनी बुधवारी हजेरी लावली. मात्र हिंगोलीत भाजपच्याच नेत्यांच्या पुढाकाराने व आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेकडे ते फिरकलेही नाहीत. पालकमंत्र्यांच्या दौºयात ते जवळ्यातील कीर्तनाला हजेरी लावणार असल्याचे नमूद असल्याने इतरांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही. मात्र भाजपमधीलच काही जणांनी ही बाब सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. यात आमदारांना विरोध करायचाय की शिंदे यांच्या वाढत्या प्रस्थाला सुरुंग लावायची तयारी चाललीय, हे कळायला मार्ग नाही. मात्र शिंदे आगामी विधानसभेच्या मैदानात षड्डू ठोकणार असल्याच्या उडणाºया वावड्यांना यातून पुष्टीच दिली जात आहे. आगामी काळात या प्रकाराचे पडसाद नक्कीच दिसतील. तोपर्यंत मात्र या चर्चांना पूर्णविराम शक्य नाही.थंडीमध्येही भाजपत गरमाहटपालकमंत्र्यांच्या दौºयानंतर सुरू असलेल्या चर्चांमुळे कडाक्याच्या थंडीतही भाजपमधील वातावरणात गरमाहट दिसून येत आहे. जो-तो आपापल्या परीने या घटनेचा अन्वयार्थ मांडत आहे.