शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात रेशन दुकानदारांच्या अडचणी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

हिंगोली : कोरोना काळात वारंवार सरकारी निर्बंध लागत असून, यात रेशन दुकानदारांना विविध अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी ...

हिंगोली : कोरोना काळात वारंवार सरकारी निर्बंध लागत असून, यात रेशन दुकानदारांना विविध अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी शासन स्तरावरून परिपत्रक काढण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने राज्य शासनाकडे केली आहे.

निवेदनात म्हटले की, केंद्र व राज्य सरकारने रास्त भाव दुकानदार यांना, तसेच त्यासंबंधित येणाऱ्या व्यक्तींना म्हणजे हमाल, वाहतूक करणारे यांना सूट दिलेली आहे. तरी सोशल डिस्टन्सिंगचे चांगल्या प्रकारे पालन होण्यासाठी आपण राज्यातील सर्व रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना, तसेच त्यांच्या वाहतूकदारांना, हमालांना सकाळी सात ते संध्याकाळी सात रास्त भाव रेशनिंग दुकाने चालू ठेवण्याचे परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काढावे व तशा सूचना रास्त भाव दुकानदार यांना द्याव्यात.

त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाढत असून, आम्ही वेळोवेळी आपणास रास्तभाव रेशनिंग दुकानदार यांना स्वतःचे आधार अधिप्रमाणित करून धान्य वितरण करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यामध्ये रोज जवळपास ६० ते ७० हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे म्हणून आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून आपण रास्त भाव रेशनिंग दुकानदार यांना स्वतःचे आधार, अंगठे अधिप्रमाणित करून धान्य वितरण करण्याची सूट द्यावी, ई पाॅस मशीनला यूएसबी कॉड दोन मीटरचा बसवून देण्यात यावा जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, अशी मागणीही निवेदनात केल्याचे जिल्हाध्यक्ष भिकूलाल बाहेती, अशोक काळे, फारुखभाई, नवनाथ कानबाळे, आदींनी सांगितले.