शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:12 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांच्या अपात्रतेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या गावात तापलेल्या राजकारणामुळे ग्रामस्थ मात्र हैराण आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांच्या अपात्रतेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या गावात तापलेल्या राजकारणामुळे ग्रामस्थ मात्र हैराण आहेत.शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांनी उपसरपंचांची निवड केली नसल्याचा आरोप करुन त्याविरोधात अप्पर आयुक्तांकडे दाद मागण्यात आली होती. त्यात विस्तार अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार अप्पर आयुक्तांनी ठोंबरे यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले होते. विशेष म्हणजे त्यानंतर गावात मिरवणूक, आतषबाजीचे प्रकारही घडले. यामुळे गावातील टोकाच्या राजकारणाची प्रचिती येते. आजी-माजी जि.प.सदस्यांचे गट हे राजकारण खेळत आहेत. मात्र एकमेकांना मात देण्यात हे प्रकरण पार मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे क.३९(३) नुसार अपील दाखल केले आहे. प्रस्तुत प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या २५ सप्टेंबर २0१८ रोजीच्या आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती आदेश दिल्याचे पत्र अवर सचिव नीला रानडे यांनी १२ आॅक्टोबर रोजी काढले आहे. तर सुनावणीची तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे म्हटले आहे.जाणीवपूर्वक त्रास-ठोंबरेमी जनतेतून निवडून आलेली सरपंच आहे. मात्र आदिवासी व महिला असल्याने जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. मी सीईओ, बीडीओंना चार ते पाचवेळा भेटले. आमच्या गावातील ग्रामसेविकेच्या अपहाराची तक्रार केली. परंतु त्याची चौकशी न करता माझ्याविरुद्धच चुकीचे अहवाल दिले. विरोधकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. त्याची कुरुंदा पोलिसांत तक्रारही दिली. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कर्मचाºयांचा पगार नाही, ग्रामसेविकेचे लक्ष नाही. प्रशासन त्यांना साथ देत आहे. यापुढे गावाच्या विकासात अडथळा निर्माण केल्यास आदिवासी समाजाच्या संघटनांमार्फत आंदोलनाचा इशारा दिला.

टॅग्स :HingoliहिंगोलीCourtन्यायालय