शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्ताचा रुग्णालयात संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: January 28, 2015 14:12 IST

उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातग्रस्त युवकाचा चार दिवसांनंतर शौचालयात मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

औंढा नागनाथ : उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातग्रस्त युवकाचा चार दिवसांनंतर शौचालयात मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. 

या बाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील मालेगाव येथून शेळय़ा-मेंढय़ा घेऊन हैदराबादकडे व्रिकीसाठी एम. एच. 0५ - ७३८ या टेम्पोने जात असताना त्याला औंढा नागनाथ तालुक्यातील धार फाटा येथे २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता अपघात झाला होता. यामध्ये चालकासोबत असलेला मजूरदार अकबर शहा सलीम शहा (वय २७, रा. मालेगाव, जि. धुळे) याच्यासह तिघे जखमी झाले होते. दरम्यान, त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना किरकोळ मार असल्याने येथेच उपचार झाले. दुसर्‍या दिवशी अकबरने मुख्य प्रवेशद्वारातच प्रात:विधी उरकल्याने गोंधळ झाला होता. त्यानंतर तो तेथून निघून गेल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र मयाताचे वडील व नातेवाईक रुग्णालय परिसरातच तीन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. २६ जानेवारी रोजी आरोग्यसेवक गणेश चव्हाण यांनी एका बंद शौचालयातून दुर्गंधी येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी हरिष दराडे यांना सांगितले. त्यांनी दरवाजा उघडला तर आत कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळले. याबाबत पोनि लक्ष्मण केंद्रे यांना माहिती दिल्यानंतर पोलिस कर्मचारी शंकर इंगोले, भीमराव चिंतारे, काशीनाथ शिंदे आदींनी पंचनामा केला. हे प्रेत अबकरचेच असल्याची खात्री त्याच्या नातेवाईकांनी केली. तर बंद शौचालयात त्याचे प्रेत कसे काय? असा सवाल केला. त्याचा शोध लावण्याची मागणी जिल्हा शल्यचिकीत्सक हेमंतकुमार बोरसे यांच्याकडे केली. तर औंढय़ात शवचिवच्छेदन करण्यापूर्वी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करीत संतप्त जमावाने तक्रारही दिली. त्यानंतर नांदेड येथे इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाईल, असे बोरसे यांनी सांगितले. याबाबत मयताच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नाही. मात्र डॉ. दराडे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. /(वार्ताहर)