संजय गांधी निराधार योजना १४४३५
श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना २८९७०
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना १५३३९
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन ८४४
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन १०५
लाभार्थी म्हणतात..
एरवीच काही काम मिळत नाही. आता संचारबंदीत अवघड होते. मात्र, शासनाने हजार रुपये वाढवून दिल्याने चांगले काम केले. शासनाचे आभार. -शांताबाई इंगळे, अंधारवाडी
कोरोनाच्या काळात तसेही जगणे मुश्कील झाले. शासनाने आम्हा निराधारांचा विचार केला, हे आमचे भाग्य. हे हजार रुपयेही आम्हाला चांगले फायद्याचे ठरतील.
- उत्तम इंगळे, बावणखोली
शासनाने जे हजार रुपये वाढवून दिले, ते चांगले केले. मात्र, बँकेत रांगा लागतात. पैसे वेळेत मिळत नाहीत. यावरही शासनाने काही उपाय केला तर आणखी चांगले होईल.
-शेख जुबेदाबी शेख इब्राहिम, हिंगोली
कोरोनाच्या काळात शासनाची ही मदत फार मोठी आहे. तसेच बँकेत लवकर रक्कम मिळण्याची व रक्कम नेण्यास जाताना अडवणूक न होण्याची काळजी घ्यावी. रस्तोरस्ती पोलीस आहेत.
- विमल गोरे, डिग्रस कऱ्हाळे
शासनाने वाढीव हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल आभार. आमच्यासाठी शासन चांगले काम करीत आहे. शिवभोजनही देते आहे. कोरोनाच्या काळात शासनाचे हे चांगले काम आहे.
- शेख बाबू शेख उस्मान, हिंगोली