शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

अंधश्रध्दा ‘विकास’ विरोधी असतात- बावगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:23 IST

अंधश्रद्धा विकास विरोधी असतात, अंधश्रद्धेमुळेच देशाचा विकास खुंटतो त्यामुळे प्रत्येकांनी वैज्ञानिक दृष्टिकोण स्विकारावा अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी २३ डिसेंबर रोजी व्याख्यानात दिली.

ठळक मुद्देअंधश्रद्धा निर्मुलन समिती : ढोंगी बुवा-बाबांपासून दूर रहा, विज्ञानाची कास धरा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अंधश्रद्धा विकास विरोधी असतात, अंधश्रद्धेमुळेच देशाचा विकास खुंटतो त्यामुळे प्रत्येकांनी वैज्ञानिक दृष्टिकोण स्विकारावा अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी २३ डिसेंबर रोजी व्याख्यानात दिली.महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समिती हिंगोली शाखेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हॉल येथे बावगे यांचे व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयाजी पाईकराव होते. यावेळी नंदकिशोर तोष्णीवाल, खंडेराव सरनाईक, अशोक अर्धापुरकर, दिवाकर माने, अशोक एंगडे, सम्राट हाटकर, कºहाळे, प्रकाश इंगोले, गजानन कुटे, अ‍ॅड. साहेबराव सिरसाट, रावण धाबे, प्रशांत बोडखे, रमेश इंगोले आदी उपस्थित होते. समितीच्या संघटनात्मक दौºयानिमित्त माधव बावगे हिंगोली येथे आले होते. पुढे बोलताना बावगे म्हणाले नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश खुनाची मालीका सुरूच आहे. मात्र आरोपींना अटक केली जात नाही हे संशयास्पद आहे. दाभोळकरांचा खुन करणारे भित्रे आहेत. त्यांनी पाठीमागुन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. परंतु मारेकºयांचा भ्रमनिराश झाला, कारण दाभोळकरांच्या मृत्यूनंतरही संघटनेचा अंधश्रध्दा निर्मुलनचा लढा अखंड चालू आहे. संघटनेमार्फत राज्यभरात एकोपा निर्माण करून सामाजिक चळवळ उभी केली जात आहे. संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी निर्भयपणे काम करीत असून वैज्ञानाची बिजे रोवत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.विज्ञानाच्या प्रयोगाने नागरिक थक्कमाधव बावगे यांनी कार्यक्रमात विविध प्रयोग करून दाखवत, बुवा-बाबा कशाप्रकारे चमत्कार करतात व फसवितात, त्याचे प्रात्येक्षिक दाखविले. विज्ञानाच्या चमत्काराने मात्र कार्यक्रमातील नागरिक थक्क झाले होते. त्यानंतर बावगे यांनी विज्ञानाच्या मदतीने कसे प्रयोग करतात हे समजावून सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना बावगे म्हणाले माणसातल्या मनातील भीती दूर करून त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याचे काम अंनिसतर्फे केले जात आहे. यामध्ये सर्वांनी एकोप्याने सहभागी होऊन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.