वरुड ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या ठिकाणी २२१० एवढी मतदारसंख्या आहे. यातून नऊ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. येथे तीन प्रभाग असून त्यांपैकी प्रभाग क्रमांक तीनची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. या प्रभागामधून माजी सरपंच अनुसयाबाई शंकर देशमुखे व त्यांचे पती शंकर देशमुखे, अनिता बालाजी माहोरे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. आता येथे सहा उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक एक व दोन प्रभागमध्ये निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये इंदूताई उल्हास राठोड चुलत सासू विरुद्ध सून अनिता संतोष राठोड यांच्यात अटीतटीच्या लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे येथील निवडणुकीत काेण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वरुड ग्रामपंचायतीमध्ये चुलत सासू विरुद्ध सुनेत लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST