शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी अवस्था हा जीवनाचा पाया होय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

सेनगाव : मानवी जीवनात विद्यार्थी अवस्था ही पूर्वांग आहे. ही अवस्था चांगली आणि कर्तव्यदक्ष रितीने पार पाडली तरच आयुष्याच्या ...

सेनगाव : मानवी जीवनात विद्यार्थी अवस्था ही पूर्वांग आहे. ही अवस्था चांगली आणि कर्तव्यदक्ष रितीने पार पाडली तरच आयुष्याच्या उत्तरंगात सुख, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. विद्यार्थी अवस्था खऱ्या अर्थाने जीवनाचा पाया असल्याने हा पाया अधिक भक्कम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प. पू. मुनिश्री १०८ अक्षयसागर महाराज यांनी केले.

महाविर दिगंबर जैन मंदिर शिलान्यास दोन दिवसीय कार्यक्रमासाठी २७ जानेवारी रोजी प. पू. अक्षयसागर महाराज आले असता, भाविकांच्या प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी जीवन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मुनिश्री अक्षयसागर म्हणाले, प्रत्येक मनुष्याची ओळख ही त्याचातील गुणांद्वारे केली जाते. विद्यार्थांकडे जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे. गुरूविषयी निष्ठा असावी, जिज्ञासा, आत्मविश्वास व दृढ संकल्प या तीन गोष्टी विद्यार्थ्यांना यशस्वी करतात. शिक्षण आमचे साध्य नाही ते साधन आहे. ज्या शिक्षणामुळे आम्ही चारित्र्यवान बनू शकतो. तेच खरे शिक्षण आहे. मातृभाषेत शिक्षणाची आवश्यकता आहे. भाषा शिकविण्यासाठी आपल्या मुलांचे बालपण हरवून घेणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. तसेच आधुनिक समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्राच्या उभाणीत मातृभाषेची कोणती भूमिका असू शकते, यांची जाणीव आज नसल्याचे दिसून येते. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरसुध्दा आमची शिक्षणपद्धती, नोकरशाही, राजकारण, प्रसिद्धी, माध्यमे, न्यायालये आणि संसदेतही इंंग्रजीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाचे प्रंचड नुकसान झाले असल्याचे मत व्यक्त केले. याबद्दल गांभीर्याने चिंतन होऊन आवश्यक ते बदल होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो नं. १९