शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:26 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.हिंगोली जिल्ह्याला लागून सहा जिल्ह्यांच्या सीमा आहेत. परजिल्ह्यातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. अवैधरीत्या दारु, पैसा वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देखरेखीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या बैठका घेऊन सर्वांना कडक सूचना करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांच्या विविध परवानग्या पोर्टलवर आॅनलाईन देण्यात येणार आहेत. शासकीय संकेतस्थळावर राजकीय नेत्यांचे फोटो भिंतीवरील पोस्टर, बॅनर्स, राजकीय झेंडे तसेच शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील पोस्टर, भिंतीपत्रके काढण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय नेते निवडणूक प्रचारासाठी शासकीय संपत्तीचा दुरुपयोग करणार नाहीत, या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येणार आहे. तक्रार व देखरेख यंत्रनेची स्थापना केली जाणार आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपविभागीय अधिकारी चोरमारे अ. पोलीस अधीक्षक यशवंत काळे आदी.

टॅग्स :Electionनिवडणूक