शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

न.प.तील विषय समित्यांसाठी रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:47 IST

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधक पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर न.प.तील विषय समित्यांची स्थापना करण्यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याच दालनात बैठक सुरू होती. बंद दाराआड यात चर्चा झाली. मात्र त्यात काय निष्पन्न झाले हे कळायला मार्ग नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधक पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर न.प.तील विषय समित्यांची स्थापना करण्यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याच दालनात बैठक सुरू होती. बंद दाराआड यात चर्चा झाली. मात्र त्यात काय निष्पन्न झाले हे कळायला मार्ग नाही.नगरपालिकेत एकूण सहा समित्या स्थापन करता येतात. यापैकी दोन समित्या तर अध्यक्ष व उपाध्यक्षांकडेच राहणार आहेत. उर्वरित चार समित्यांसाठी निवड प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यात संख्याबळ उपयोगी पडणार की नाही, हा प्रश्नच असला तरीही या मनसुब्यांना सुरुंग लावण्यासाठी सायंकाळी उशिरा हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दोलायमान होण्याची भीती वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीचे सभागृहात सर्वाधिक १३ नगरसेवक आहेत. तर काँग्रेस-६, शिवसेना-६, भाजप-३, मनसे-२, एमआयएम-१, अपक्ष-१ असे इतर पक्षीयांचे संख्याबळ आहे. संख्याबळाचाच विचार केला तर राष्ट्रवादीकडे दोन, काँग्रेस व सेनेकडे प्रत्येकी एक सभापतीपद येवू शकते. त्यादृष्टिने हालचालीही सुरू आहेत.न.प.त सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा मुद्दा मागील काही दिवसांपासून जोरदारपणे चर्चेत आला आहे. त्याला पुष्टी देण्यासाठीच आजच्या सभेतही विरोधकांनी एकत्र येत किल्ला लढविला. अवैध नळ जोडण्यांच्या दंडवसुलीचा मुद्दा चक्क सभागृहाच्या पटलावर आल्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्याचाच फायदा घेत विरोधी मंडळींचे बळ वाढले. उपनगराध्यक्षपद राकाँकडे असल्याने अर्धा सत्ताधारी असलेला हा पक्षही नाराजांनी भरलेला आहे. तर अनेक दिग्गजांचा भरणा असल्याने या पक्षातूनही विषय समित्यांठी अनेक महत्त्वाकांक्षी ऐनवेळी समोर येतील, हेही तेवढेच खरे. शिवाय राकॉं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही तसा आदेश दिला.