सवना गावठाण डीपीसह रोहित्र गेल्या दोन महिन्यांपासून दोन फेजवर चालत आहे. गावातील भागातील बोअर बंद पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी काही ग्रामस्थांना व जनावरांना भटकण्याची वेळ आली आहे. सवना गावातील विजेच्या समस्येसाठी गोरेगाव येथील महावितरण कार्यालयास संपर्क करावा लागत आहे. याठिकाणीही कोणी फोन उचलत नाही. यामुळे विजेच्या समस्यांसाठी संपर्क कोणाशी साधावा, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. यासाठी सवना येथील गावकऱ्यांनी सेनगाव येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. सवना गावचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सरपंच शोभाबाई नायक, ॲड. प्रवीण नायक, शिवाजी नायक, नितीन नायक, गजानन साळवे, भागवत शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो नं. १६