शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बजेटबद्दल कहीं खुशी कहीं गमची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

गृहिणी म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहताना महागाई कमी होईल, असा कोणताच निर्णय यात दिसत नाही. तर कर प्रणालीतही काहीच बदल ...

गृहिणी म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहताना महागाई कमी होईल, असा कोणताच निर्णय यात दिसत नाही. तर कर प्रणालीतही काहीच बदल न झाल्याने सामान्यांच्या खिशाला बसणारी झळ कायम राहणार आहे.

सीमा मगर, गृहिणी

या अर्थसंकल्पात जीएसटीबद्दलच्या अटींबाबतही काही निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीच झाले नाही. तरीही कराचा नवा भुर्दंड नाही, याचे समाधान आहे. दळणवळणासाठी भरीव तरतूद दिसत आहे.

अभिजित निंघूरकर, किराणा व्यापारी

पेट्राेल व डिझेलवर अधिभाराचे संकेत शासनाने दिले आहेत. मात्र भाववाढ होणार नाही, असेही सांगितले. तूर्त यावर काही सांगणे अवघड आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यावरच कळेल.

सुमित चौधरी, पेट्रोल पंपचालक

ट्रांसपोर्ट व्यवसाय आधीच मंदीत आहे. त्यात पेट्राेल, डिझेलचे दर वाढतच आहेत. आता नव्याने जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला तो चांगला असला तरीही त्यात एक वर्षापर्यंत नवीन गाडी खरेदीसाठी जीएसटीत माफी दिली पाहिजे. तर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.

जगजितराज खुराणा, वाहनमालक

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना करमाफी देण्याची व पेन्शनधारकांना आयकर परतावा भरावा लागणार नाही, हा केंद्राने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे नक्कीच ज्येष्ठ नागरिक व पेन्शनधारकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

-कुंडलिकराव निर्मले, ज्येष्ठ नागरिक, हिंगोली.

शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, हमीभावाची घोषणा केली तशी खरेदी केंद्र सुरू करून त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच सिंचनक्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने तुषार, ठिबक खरेदीची सबसिडी वाढवून ८० टक्के करणे आवश्यक होते.

-डी.एम. माखणे, शेतकरी, साळवा

लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ तसेच १०० नव्या सैनिकी शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय युवकांसाठी वरदान ठरणार आहे. या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी युवकांना मिळणार आहे. तसेच वन नेशन वन रेशनकार्ड योजना लागू करण्याचा घेतलेला निर्णयही चांगला आहे.

-सुरेश पाईकराव, युवक, येलकी