शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

पाचपैकी तीन संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:36 IST

दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमात शासनाने निवडलेल्या पाचपैकी तीनच संस्थांनी काम केले असून त्यातही एका संस्थेला ५0 चे उद्दिष्ट असताना तिने २५२ जणांना प्रशिक्षण दिल्याने पन्नास टक्क्यांपर्यंत तर उद्दिष्ट गाठता आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमात शासनाने निवडलेल्या पाचपैकी तीनच संस्थांनी काम केले असून त्यातही एका संस्थेला ५0 चे उद्दिष्ट असताना तिने २५२ जणांना प्रशिक्षण दिल्याने पन्नास टक्क्यांपर्यंत तर उद्दिष्ट गाठता आले आहे.हिंगोली जिल्ह्यासाठी निवडलेल्या पाच संस्थांनी ५२१ जणांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३१६ जणांना प्रशिक्षण दिले जात आहे. यात ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट व एज्युकेशनल सोसायटी सोसायटीला ७0 एवढे उद्दिष्ट होते. प्रत्येक तालुक्यातून १४ जणांना प्रशिक्षण द्यायचे असताना केवण केवळ कळमनुरीचे १४ व औंढ्याचे २0 अशा ७0 जणांनाच संधी मिळाली. कॅपस्टॉन फॅसिलीटीज मॅनेजमेंट प्रा.लि. या संस्थेला ५१ चे उद्दिष्ट होते. यालाही प्रतिसाद न मिळाल्याने २९ जणांना प्रशिक्षण दिले. ओरियन एज्युटेकला ३00 एवढे मोठे उद्दिष्ट असताना या संस्थेने काहीच केले नाही. असाच प्रकार नाईस कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटीचा असून ५0 प्रशिक्षणार्थ्यांचे उद्दिष्ट असूनही कामच केले नाही.इंण्डो जर्मन टूल रूम या संस्थेला मात्र केवळ ५0 एवढे उद्दिष्ट असताना त्यांनी हिंगोली-६५, कळमनुरी-४२, वसमत-५६, औंढा-२५, सेनगाव-६४ अशा २५२ जणांना प्रशिक्षण दिले आहे. या योजनेत ज्या संस्था कामच करीत नाहीत, अशांची निवड करण्यामागे शासनाचे गणितच कळत नाही. तर प्रशिक्षणही त्याच त्या प्रकारचे राहात असल्याने बाजारपेठेत रोजगार मिळत नाही. त्यामुळे प्रशिक्षणातील इतर पर्यायही उपलब्ध होणे गरजेचे आहे.ओरियन एज्युकेशन सोसायटीला उद्दिष्ट जास्त देण्यामागे त्यांच्याकडे विविधता असलेले अभ्यासक्रम हे कारण असावे. मात्र त्यांनी प्रशिक्षणच न घेता यावर पाणी फेरले आहे. या संस्थेकडे बीपीओ व्हाईस अ‍ॅण्ड कॉम्प्युटर हार्डवेअर असिस्टंट, हॉस्पिटॅलिटी असि. अ‍ॅण्ड हाऊसकीपर, ड्रायव्हर कम कुरियर अ‍ॅण्ड ज्युनियर क्लर्क, आॅफिस असिस्टंट, टेलर अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल सेविंग मशिन आॅपरेटर, सॉफ्टवेअर अ‍ॅप्लीकेशन इन पॅटर्न मेकींग आदी प्रकारच्या प्रशिक्षणाचा यात समावेश होता.

टॅग्स :Hingoliहिंगोली