शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.त अजूनही वातावरण गरमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:10 IST

जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील वादामुळे वातावरण अजूनही तापलेलेच आहे. आज दोन आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक झाली. तर शिवसेनेकडून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील वादामुळे वातावरण अजूनही तापलेलेच आहे. आज दोन आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक झाली. तर शिवसेनेकडून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.शेवाळा येथे काँग्रेस व शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांचा वाद आहे. त्यामुळे या दोन गटांत कायम कुरबूर सुरू असते. दोन्ही गट राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने विकास कामांतही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हस्तक्षेप सुरू असतो. मात्र आतापर्यंत चालत आलेल्या या वादाला आता वरच्या स्तरावर फारसे महत्त्व नव्हते.काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांच्या स्वीयसहायकावर झालेल्या हल्ल्यानंतर जि.प.त अचानक राजकीय धुमश्चक्री सुरु झाली. गावातील वाद वरच्या स्तरापर्यंत पोहोचला.कधी नव्हे, ते आ.टारफे यावेळी आक्रमकपणे समोर आले. त्यांनी या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची मागणी लावून धरली होती. शिवाय त्यांच्या स्वीयसहायकाने यात गुन्हाही दाखल केला. त्यामुळे शिवसेनेचे कळमनुरीचे पं.स. उपसभापती गोपू पाटील व इतरांची नावे यात आली. तर दुसरीकडे गावातील वादाच्या प्रकरणामुळे याच गावच्या असलेल्या जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनीही जातीवाचक शिवीगाळ व धमकावल्याचा गुन्हा आमदाराचे स्वीयसहायक श्रीनिवास नितनवरे, अभय सावंत आदींवर दाखल केला. मागील दोन दिवसांपासून या प्रकरणावरून वातावरण तापलेलेच आहे. काल दोन्ही बाजूंनी निषेधाची निवेदनेही आली. आज पुन्हा जि.प. अध्यक्षांना शिवीगाळ करणाºयांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नंदू खिल्लारे, प्रकाश नरवाडे यांच्यासह शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना भेटले.दरम्यान, जि.प.तील या वादावरून राजकारणाचा स्तर घसरत चालल्याच्या प्रतिक्रिया देत अनेकांनी हा विषय थांबण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.बैठक : सदस्यांची मते जाणून घेतलीयाबाबत आज आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या दालनात घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना या दोघांनीही सावध भूमिका घेतली. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तर यापुढे असे प्रकार घडूच नयेत, असा बंदोबस्त केला जाईल, असेही ते म्हणाले. तर ही माहिती माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतरच सांगितली जाईल, असेही म्हणाले.जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपची भूमिका काय असेल असे विचारले असता आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सध्या तरी वेट अ‍ॅण्ड वॉच हीच भूमिका असल्याचे सांगितले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदPoliticsराजकारण