शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नाफेडची ३.२३ कोटींची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:38 IST

जिल्ह्यात नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर झालेल्या प्रकारामुळे यापूर्वी शेतकºयांना चुकाºयांसाठी नाहक चकरा मारण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता बाजार समित्यांना दररोज याबाबतचा खरेदीचा अहवाल देण्यास बजावले असून २१ फेब्रुवारीपर्यंत ६७९ शेतकºयांची ५९४२ क्विंटल तूर खरेदी केली आहे. ती ३.२३ कोटी रुपयांची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर झालेल्या प्रकारामुळे यापूर्वी शेतकºयांना चुकाºयांसाठी नाहक चकरा मारण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता बाजार समित्यांना दररोज याबाबतचा खरेदीचा अहवाल देण्यास बजावले असून २१ फेब्रुवारीपर्यंत ६७९ शेतकºयांची ५९४२ क्विंटल तूर खरेदी केली आहे. ती ३.२३ कोटी रुपयांची आहे.हिंगोली जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावरून अनेक वाद उभे राहिलेले आहेत. कुठे वेळेवर केंद्र सुरू झाले नाीहत तर कुठे खरेदी सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच केंद्र बंद पडण्याचे प्रकार घडले. गतवर्षी तर यातच पूर्ण वर्षे वाया गेले. तरीही तुरीची खरेदी अंतिम झाली नव्हती. पावसाळ्यातही या खरेदीचा मुद्दा गाजताना दिसत होता. हिंगोली व जवळ्यात तर पावसाळ्यात शेतकºयांचा माल भिजण्याचा प्रकारही घडला होता. यंदा खरेदी सुरू झाली आणि उडीद, मुगाची खरेदी सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी हिंगोलीत अनियमिततेचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे चुकारे मिळण्यात अडचणी उभ्या राहिल्या होत्या. शेतकºयांना उपोषणे करण्याची वेळ आली होती. इतर ठिकाणीही फारसे वेगळे चित्र नव्हते. शेतकºयांना चुकारे वेळेवर मिळत नसल्याचा अनुभव जिल्हाभर येत होता.या सर्व प्रकारानंतर आता दैनंदिन अहवाल सादर करण्याचा आदेश नाफेडच्या केंद्रांना दिला आहे. यामुळे खरेदीच्या प्रक्रियेत काही गडबड होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी नियंत्रणही ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र रोज केवळ दहा ते तीस शेतकºयांचाच माल येत असल्याचे चित्र असून यापूर्वी होणारी गर्दी आता दिसत नाही. याउलट मोंढ्यातील बिटात त्यापेक्षा जास्त माल येत आहे. हमी केंद्रांची हमीच उरली नसल्याचे चित्र आहे.अशी आहे खरेदी : बाजार समित्यांचे चित्र२१ फेब्रुवारी रोजी हिंगोलीत ११ जणांची १२७ क्ंिवटल, सेनगावात २५ जणांची २३८, कळमनुरीत २१ जणांची १७३, वसमतला १८ जणांची १२0 तर जवळा बाजार येथे ३६ जणांची २९३ क्ंिवटल तूर खरेदी झाली आहे. आतापर्यंतचा विचार केला तर हिंगोलीत ३३ जणांची ३८६ क्विंटल, सेनगावात १८५ जणांची१९६२ क्विंटल, कळमनुरीत १८२ जणांची १२६२ क्ंिवटल, वसमतला ११२ जणांची ६४८ क्ंिवटल, जवळा बाजारला १६७ जणांची १६८८ क्ंिवटल तूर खरेदी झाली आहे. सर्वाधिक सेनगावात तर सर्वांत कमी हिंगोलीत खरेदी झाल्याचे दिसून येत आहे.हिंगोलीत २१.0६ लाख, सेनगावात १.0६ कोटी, कळमनुरीत ६८.४५ लाख, वसमतला ३५.३४ लाख, जवळा बाजारला ९२.0२ लाखांची खरेदी झाली असून काहींचीच चुकाºयांची प्रक्रिया झाली आहे.