लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील नाईकनगर भागात विद्युत जोडणीचे काम करताना शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली.माधव विठ्ठल चांदणे (५०) असे मयताचे नाव आहे. ते नाईकनगर भागात विद्युत खांबावर लाईन जोडणीसाठी पडत्या पावसात चढले होते. दरम्यान, शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. चांदणे खाजगीरीत्या महावितरणसाठी काम करत, असे सांगितले जाते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र तो आमचा कर्मचारी नसल्याचे सांगितले. चांदणे यांचा मृतदेह खांबावर लटकत्या अवस्थेमुळे असल्याने त्याला खाली घेण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, रामेश्वर बेंद्रे आदींनी मदत केली. घटनास्थळी सपोउपनि गजानन कल्याणकर, शेख शकील आदींनी घेवून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
शॉक लागून हिंगोलीत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:02 IST