शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

शिवसेना म्हणाली, कर्जमाफीच्या याद्या न लावणा-या  ' भाजप सरकार ' चा दशक्रियाविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 16:59 IST

कर्जमाफी झालेल्या शेतक-यांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणा-या शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर भाजप सरकारच्या प्रतीकात्मक प्रेतासमोर रडापड केली. यानंतर या प्रेताची दशक्रियाविधी करून शिवसैनिकांनी मुंडण करत आंदोलन केले.

हिंगोली, दि. २२ : कर्जमाफी झालेल्या शेतक-यांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणा-या शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर भाजप सरकारच्या प्रतीकात्मक प्रेतासमोर रडापड केली. यानंतर या प्रेताची दशक्रियाविधी करून शिवसैनिकांनी मुंडण करत आंदोलन केले.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शिवसेनेने आज भाजप सरकारच्या नावाने सकाळी ११ वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाजप सरकारच्या प्रतीकात्मक प्रेताच्या  नावाने रडापड केली. ढोल वाजवा आंदोलन करूनही शासनाने कोणत्याच बँकेसमोर कर्जमाफी झालेल्या शेतक-यांच्या याद्या लावल्या नाहीत. यामुळे आज भाजप सरकारचा दशक्रियाविधी घालत मुंडण आंदोलन केले. 

यांनतर जिल्हा उपनिबंधक सुधीर म्हेत्रेवार यांची आंदोलकांनी भेट घेतली. यावेळी म्हेत्रेवार यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत माहिती देऊन जिल्ह्यात ६९६ केंद्रांवरून कर्जमाफीसाठीचे अर्ज भरून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्ह्यात दीड लाखांपेक्षा कमी रक्कम थकबाकी असलेले ६६०२५ थकबाकीदार असल्याचे सांगितले. हि रक्कम ३६२ कोटी रुपयांची असल्याचे ते म्हणाले. तर त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या खातेदारांची संख्या १0 हजार ६८७  असून  रक्कम २९३ कोटी एवढी आहे. हे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असल्यास उर्वरित हप्ते भरून ते अर्ज भरू शकतात, असेही ते म्हणाले. यासोबतच एका कुटुंबात एकालाच कर्जमाफीत लाभ मिळू शकते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आंदोलनात जिल्हाप्रमुख संतोष बांगर, सभापती रामेश्वर शिंदे, कडुजी भवर,  युवासेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, सुभाष बांगर, दिलीप बांगर, राम कदम, भानुदास जाधव, गोपू पाटील, आनंदराव जगताप आदींसह मोठ्याप्रमाणात शिवसैनिकांचा सहभाग होता.