शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शशिकांत वडकुते राज्य उपाध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST

बांधकाम साहित्य रस्त्यावर हिंगोली : शहरात अनेक भागात बांधकामे सुरू आहेत. बांधकामे करताना बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. ...

बांधकाम साहित्य रस्त्यावर

हिंगोली : शहरात अनेक भागात बांधकामे सुरू आहेत. बांधकामे करताना बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्यानंतर काही नागरिक अनेक दिवस बांधकाम सुरू करीत नाहीत. त्यामुळे बांधकाम साहित्य तसेच रस्त्यावर पडून राहत आहे. यावरून दुचाकी वाहन गेल्यास वाहने घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे लक्ष देऊन बांधकाम साहित्य रस्त्यावर अनेक दिवस ठेवणाऱ्या नागरिकांवर कारावाई करावी, अशी मागणी होत आहे.

शहरातून धावताहेत जड वाहने

हिंगोली : नांदेड व अकोलाकडून येणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी शहराच्या बाहेरून वळण रस्ता काढून दिला आहे. शहरातून जाणाऱ्या रस्त्यावरील जड वाहनांची वर्दळ कमी व्हावी, हा उद्देश त्यामागे होता. मात्र काही दिवसांपासून जड साहित्याची वाहतूक करणारी वाहने शहरातून जाणाऱ्या मार्गावरून धावत आहेत. या मार्गावर अगोदरच वाहनांची वर्दळ असते. त्यात जड वाहने धावत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जड वाहनांना वळण रस्त्यावने काढून द्यावे, अशी मागणी होत आहे.

रेल्वेस्थानक निर्मनुष्य

हिंगोली: येथून अकोला व पूर्णा मार्गावर रेल्वे धावतात. सध्या कोरोनामुळे रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली असली तरी प्रवाशांची वर्दळही कमी झाली आहे. केवळ लांब पल्ल्याच्या रेल्वे धावत आहेत. त्यात प्रवासी रिझर्वेशन करीत असल्याने रेल्वे येण्याच्या अगोदर काही मिनिटे येत आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानक सामसूम दिसून येत आहे. शनिवारी रेल्वे कर्मचाऱ्याशिवाय इतर प्रवासी दिसून आले नाहीत.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक

हिंगोली: शहरातून नांदेड, परभणी, वाशिम आदी मार्गावर खासगी प्रवासी वाहने धावतात. एसटी बस प्रवाशांसाठी कमी पडत असल्याने प्रवाशांचा ओढा खासगी प्रवासी वाहनांकडे आहे. मात्र खासगी वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवित आहेत. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हायमास्ट दिवे बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील मुख्य मार्गावर काही ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले आहेत. मात्र जुन्या नागरी वस्तीतील काही भागात अद्यापही हायमास्ट दिवे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी चालताना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या भागातही सुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.