शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

कळमनुरी येथील सात कर्मचारी प्रतिनियुक्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:38 IST

येथील पंचायत समिती कार्यालयातील सात कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून हिंगोली येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. तर नऊ पदे रिक्त आहेत. ८ वेळा मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची विनंती केली; परंतु प्रतिनियुक्त्या रद्द होत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील पंचायत समिती कार्यालयातील सात कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून हिंगोली येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. तर नऊ पदे रिक्त आहेत. ८ वेळा मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची विनंती केली; परंतु प्रतिनियुक्त्या रद्द होत नाही.कर्मचारी कमी असल्यामुळे पं.स.च्या कामकाजात व्यत्यय येत आहे. कामकाजावर परिणाम होत आहे. येथील बी.व्ही. देशमुख वरिष्ठ सहाय्यक हे ४ जुलै २०१२ पासून हिंगोली जि.प. येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. कनिष्ठ सहायक ए.एच. वर्मा हे १८ जुलै २०१४ पासून वाहनचालक, निश्वल कांबळे हे २९ एप्रिल २०१४ पासून, विस्तार अधिकारी एस.डी.गुठ्ठे या १५ मे २०१५ पासून, कनिष्ठ लेखाधिकारी व्ही.ओ. कीर्तनकार हे १३ जुलै २०१७ पासून, कनिष्ठ सहाय्यक सय्यद फरहानोद्दीन ११ जुलै २०१६ पासून तर परिचर एस.एस.स्वामी हे १२ मे २०१६ पासून हिंगोली येथील जिल्हा परिषदेकडे प्रतिनियुक्तीवर आहेत. प्रतिनियुक्ती करण्याचे अधिकार फक्त विभागीय आयुक्तांना आहेत. असे असतानाही मात्र पाच ते सहा वर्षापासून काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. या कर्मचाºयांना तात्काळ कार्यमुक्त करावे, यासाठी येथील गटविकास अधिकाºयांनी ८ ते ९ वेळा मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्राद्वारे विनंती केली; परंतु या पत्राची दखल अद्यापपर्यंतही घेतल्या गेली नाही. ७ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर तर ९ कर्मचाºयांची पदे रिक्त त्यामुळे पं.स.च्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्याच कर्मचाºयांवर पं.स.चे दैनंदिन कामकाज करून घ्यावे लागत आहे. प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करून रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती