शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सेनगाव येथे तलाठ्याची बनावट स्वाक्षरी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:40 IST

शासनाच्या निराधार योजनेच्या काही प्रस्तावातील तलाठी प्रमाणपत्रावर बोगस स्वाक्षरी करून शिक्के मारल्याचे अर्ज पडताळणीत उघड झाले होते.

सेनगाव (हिंगोली ) : शासनाच्या निराधार योजनेच्या काही प्रस्तावातील तलाठी प्रमाणपत्रावर बोगस स्वाक्षरी करून शिक्के मारल्याचे अर्ज पडताळणीत उघड झाले होते. याप्रकरणी चौकशी करून वाघजाळी येथील एका जणाविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील तहसील कार्यालयात १९ जानेवारीला दाखल निराधार लाभार्थी यांच्या प्रस्तावाची छाननी चालू करण्यात आली. यावेळी तालुक्यातील कहाकर बु सज्जा अर्तगत वाघजाळी येथील प्रयागबाई दत्ता मोरे, शोभाताई दत्ता मोरे, अखतर बी शेख नुर, शेख सयादिन शेख ईलाइ यांच्या प्रस्तावात तलाठी यांची संशयास्पद स्वाक्षरी व बनावट शिक्के वापरले असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणात तहसीलदार वैशाली पाटील यांनी  अधिक तपासणी केली असता प्रस्तावातील स्वाक्षरी व शिक्के बनावट स्पष्ट झाले. यावर याची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार पाटील यांनी तलाठ्याला दिले होते. 

यानंतर सदर प्रस्ताव दाखल करणाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. यात त्यांनी सांगितले कि, ग्रामसेवक व तलाठी यांच्या स्वाक्षरी आणण्यासाठी गावातीलच संजय तांबीले यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आले होते. यावरून तांबीले याच्या विरोधात तलाठी डि. एस. इगळे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली