शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावच्या क्रीडा संकुलासाठी अजूनही उदासीनता कायम; २५ वर्षे उलटूनही हालचाल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:50 IST

तालुकानिर्मितीला २५ वर्षे उलटले तरीही तालुक्याच्या ठिकाणी क्रिडा विकासासाठी असणारे क्रिडा संकूल अद्यापही उभारल्या गेले नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतरही सेनगाव तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला असून याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. 

सेनगाव (हिंगोली )  : तालुकानिर्मितीला २५ वर्षे उलटले तरीही तालुक्याच्या ठिकाणी क्रिडा विकासासाठी असणारे क्रिडा संकूल अद्यापही उभारल्या गेले नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतरही सेनगाव तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला असून याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. 

येथील तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. क्रिडा विकासाच्या धोरणाला चालना मिळावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुकास्तरावर सुसज्य मैदान मिळावे, या करीता शासनस्तरावर तालुका क्रिडा संकुल उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु सेनगाव तालुक्यात मात्र या क्रिडा विकास धोरणाला प्रशासनाच्या उदासिनतेचा फटका बसला आहे. सेनगाव तालुका निर्मिती होवून २५ वर्षे उलटले तरी तालुका क्रिडा संकुल उभे राहू शकले नाही. येथील क्रिडा संकुल उभारण्याकरीता राज्य शासनाने ३ वर्षापुर्वी १ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता. या क्रिडा संकुलाकरीता एकूण ५ एकर जमिनीची गरज असून प्रशासन मागील १० वर्षापासून सेनगाव परिसरात जमिनीचा शोध घेत आहे.

सेनगाव परिसरात शासकीय गायरान जमिन उपलब्ध नाही, शासकीय दर कमी असल्याने संकुलाकरीता परिसरातील शेतकरी महागडी जमीन देण्यास नकार दर्शवित आहेत. अशा स्थितीत प्रशासनाकडून अन्य पर्यायाचा शोध घेताना दिसून येत नाही, वरिष्ठ अधिकारी, जबाबदार लोकप्रतिनिधींनी क्रिडा संकुलाकरीता कोणताही पाठपुरावा करताना दिसत नाही, मागील वर्षभरापासून जागेचा शोध घेणारी यंत्रणाच दिसत नाही. त्यामुळे २५ वर्षानंतरही तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. 

कार्यालयास २० लाखांचा निधी प्राप्ततालुका क्रिडा संकुलाकरीता येथील तहसील कार्यालयास २० लाख रुपयाचा निधीही प्राप्त झाला आहे. परंतु हा निधी आला तसाच पडून आहे. तालुका क्रिडा संकुलाच्या जागेकरीता, जमिन संपादनाकरीता महसूल प्रशासनाच्या वतीने जबाबदार अधिकार्‍याकडे भुसंपादनाची जबाबदारी दिली नसल्याने तसेच क्रिडा विभागाच्या अधिकार्‍यांकडूनही याचा पाठपुरवा होत नसल्याने तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न उदासिन धोरणात लटकत पडला असून तालुक्यातील खेळाडूंचे भविष्य मैदानाअभावी अंधकारमय बनले आहे.अधिकार्‍यांचे दुर्लक्षतालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. विशेष म्हणजे याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.