शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा ३४१ क्विंटल गहू पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST

हिंगोली : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा स्वस्त धान्य दुकानातील ३४१ क्विंटल गहू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. ही कारवाई ...

हिंगोली : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा स्वस्त धान्य दुकानातील ३४१ क्विंटल गहू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. ही कारवाई हिंगोली शहरालगत लिंबाळा एमआयडीसी परिसरात ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. याप्रकरणी ट्रकसह एकूण २७ लाख ३ हजार ५९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

हिंगोली ते औंढा नागनाथ रोडवरील लिंबाळा एमआययडीसी येथे काळ्या बाजारात जाणारा गहू येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ फेब्रुवारी रोजी या मार्गावरून जाणाऱ्या ट्रक (क्र. एम.एच. २६ बीई २९३५) या वाहनास थांबवून चालकाची विचारपूस केली. यावेळी ट्रकमध्ये ३४१ क्विंटल ५५ किलो वजनाचे गव्हाचे ३४० पोती आढळून आले. आणखी चौकशी केली असता हा गहू मंगरूळपीर (जि. वाशिम) येथून आणल्याचे चालकाने सांगितले. मालाच्या पावत्याची पाहणी केली असता गहू व पावत्याबाबत पोलिसांना संशय आला. त्यामुळे ट्रक ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आला. तसेच पोलीस उपनिरीक्षक के.डी. पोटे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून चौकशीसाठी मंगरूळपीर येथे पाठविण्यात आले. तेथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना पावत्या दाखविल्या असता त्या पावत्या बनावट असल्याचे समजले. सदरचा गहू हा स्वस्त धान्य दुकानातील असल्याचेही चौकशीत समोर आले. गहू व ट्रक ताब्यात घेतला असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक के. डी. पोटे यांच्या फिर्यादीवरून किशन नागोराव धुळगुंडे (रा. पोलीसवाडी ता. लोहा), विनोद ऊर्फ रवि जाधव व त्याचा मुनिम अशा तिघांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक उदय खंडेराय करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, विलास सोनवणे, बालाजी बोके, संभाजी लेकुळे, सुनील अंभोरे, राजू ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, दीपक पाटील आदींच्या पथकाने केली.

फोटो फाईल ०६एचएनएलपी२०