शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसखाली मूल चिरडूनही तक्रार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:31 IST

वसमत शहरातील पाटी नगर भागात मंगळवारी एका स्कूलबसच्या चाकाखाली दोन वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत शहरातील पाटी नगर भागात मंगळवारी एका स्कूलबसच्या चाकाखाली दोन वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र या प्रकरणी मयताच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिलेली नसल्याने घटनेचा गुन्हा नोंद झाला नसल्याचा प्रकार समोर आला आहे.वसमतमध्ये अनेक खासगी शाळांच्या मालकांनी स्कूलबस द्वारे विद्यार्थी ने-आण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. आॅटो, व्हॅन, जीप, कार, पीकअप व मोठ्या गाड्यांना स्कूल बसचे नाव देवून विद्यार्थी कोंबून वाहतूक होत असते. शहरात अशी किती स्कुलबस धावतात, याचीही कोणाला माहिती नाही. अशाच एका स्कूलबसने मंगळवारी एका दोन वर्षीय बालकाला चिरडून ठार मारल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर वसमत पोलीस घटनास्थळी गेले. मात्र सदर प्रकरणी मयत बालकाच्या पालकांनी तक्रारच दिलेली नसल्याने गुन्ह्याची अद्याप नोंद नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.दोन वर्षीय बालक ठार झाल्याची घटना घडून दोन दिवस झाले तरी प्रकरणाची नोंद न होणे, गुन्हा दाखल न होणे, तक्रार न देणे हा प्रकारही चिंता वाढवणारा आहे. परस्पर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही वृत्त आहे. आता तक्रार न आल्यास पोलीस सरकार पक्षातर्फे फिर्याद देतात की तक्रार नाही म्हणून दुर्लक्ष करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या प्रकरणी सपोनि आजमखान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकरणाची तक्रारच आली नसल्याचे त्यांनी सांगून पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिल्याचे सांगितले.पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडताच घटनास्थळी भेट दिली. तक्रार देण्याची विनंतीही केली मात्र अद्याप तक्रार आलेली नाही. या प्रकरणी फिर्यादीने कधीही तक्रार दिली की कारवाई करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.