शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सुरू झाले महसूल दस्त स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:32 IST

महसूल विभागाच्या जमीनविषयक महत्त्वपूर्ण दस्तावेजांच्या स्कॅनिंगचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले असून मागील आठ दिवसांत दोन लाखांवर दस्तांचे स्कॅनिंग झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महसूल विभागाच्या जमीनविषयक महत्त्वपूर्ण दस्तावेजांच्या स्कॅनिंगचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले असून मागील आठ दिवसांत दोन लाखांवर दस्तांचे स्कॅनिंग झाले आहे.मागील दोन वर्षांपासून हे काम ठप्प पडले होते. सातबारा संगणकीकरणानंतर बदलून गेलेले जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी हा स्कॅनिंगचा मुद्दा हाती घेतला होता. त्यामुळे संबंधित कंत्राट घेणाऱ्यास मुदतवाढ देवून कामाला लावले होते. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाचे मिळून ३७.७0 लाख दस्त स्कॅनिंग करून घेण्याचे नियोजन होते. मात्र १२ लाखांच्या आसपास दस्त स्कॅन झाल्यानंतर हे काम बंद पडले होते. त्यामुळे पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी मोठी दमछाक झाली. प्रशासनाने वारंवार नोटिसा देवूनही संबंधित कंत्राटदार बधत नव्हता. महाभूमिअभिलेख विभागाकडूनही यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आता हे काम सुरू झाले व त्याला गतीही आली आहे.यात हिंगोली तालुक्याच्या ७.४३ पैकी ४.३२ लाख, सेनगाव तालुक्याचे ४.९८ पैकी २.0७ लाख, कळमनुरी तालुक्याचे ९.६७ पैकी ३.८३ लाख, औंढा तालुक्याचे ५.७0 पैकी २.२१ लाख, वसमत तालुक्याचे ९.९0 पैकी १.९४ लाख दस्तांचे स्कॅनिंग करण्यात आले. हे स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर जिर्ण कागदपत्रांचे कायमस्वरुपी डिजिटायझेशन होणार आहे. त्याचा प्रशासनाला माहितीसाठीही मोठा उपयोग होणार असून एका क्लिकवर माहिती मिळणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली