शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

सेनगाव : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून लहुजी साळवे कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा हिंगोलीच्या ...

सेनगाव : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून लहुजी साळवे कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा हिंगोलीच्या वतीने ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला व गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या एक दिवसीय व्याख्यानमालेचे पुष्प प्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे कोल्हापूरकर हे गुंफणार असून ते राष्ट्रनिर्माण कार्यात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान या विषयावर उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.

हिंगोली जिल्हा लहुजी साळवे कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने मागील २००७ पासून जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. गेल्या १४ वर्षांपासून या व्याख्यानमालेचा उगम जिल्ह्यात झाला असून महापुरुषांची असलेली विचारधारा तळागाळातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावी व त्या विचारांचा अंमल व्हावा या हेतूने क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ यांनी समाजातील परिवर्तनवादी विचाराच्या लोकांच्या सहकार्याने जिल्ह्यात असाच एक वैचारिक विचारमंच निर्माण व्हावा या सर्वांच्या प्रयत्नातून साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षीप्रमाणे या वर्षी केले आहे. ही व्याख्यानमाला ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी शहरातील महावीर भवन रामलीला मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. या एक दिवसीय साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे पुष्प प्रसिद्ध विचारवंत तथा व्याख्याते प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे कोल्हापूरकर हे गुंफणार असून राष्ट्रनिर्माण कार्यात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. या वेळी अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.ए. खिल्लारे, उद्घाटक आमदार रावसाहेब अंतापूरकर देगलूर विधानसभा, प्रमुख अतिथी बालाजी थोटवे प्रदेशाध्यक्ष लहुजी साळवे कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, हिंगोली येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ तथा समाजभूषण डॉ. अमोल धुमाळ, उपकोषागार अधिकारी दीपक गवलवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला व गुणवंतांचा सत्कार आयोजनकामी जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार सोनवणे, उपाध्यक्ष हरिभाऊ सोनवणे, आत्माराम गायकवाड, रामानंद आठवले, श्रावण मंडलिक, एन. उबाळे, सचिन आठवले, जे.पी. खंदारे, बी.आर. गाडे, एस.वाय. चव्हाण, बी.बी. लांडगे, बी.एल. खंदारे, एस.एस. पाटोडे, आर.के. वैरागड सह पदाधिकारी लहुजी साळवे कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व समाज बांधवांकडून करण्यात आले आहे.