शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत अतिक्रमणधारकांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:32 IST

शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली. त्यांनी याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.जलेश्वर तलावालगतच्या जवळपास ४00 जणांना अशा प्रकारच्या नोटिसा आल्या आहेत. २८ फेब्रुवारीच्या नोटिसांत ९ मार्च ही अंतिम तारीख असल्याने आज तहसीलला गर्दी वाढली होती. यापैकी काहींची अतिक्रमणे तर काहीजण जागेची मालकीस असल्याचे सांगत आहेत. या भागातील साठ ते ७0 जणांनी तहसीलदार गजानन शिंदे यांची भेट घेवून कैफियत मांडली. गेल्या अनेक दिवसांपासून रहिवासी असताना अचानक व विलंबाने नोटिसा आल्या. ९ मार्चपर्यंतच अतिक्रमण पुरावे सादर करण्यास मुदत दिल्यानेही काहींनी नाराजी व्यक्त केली. तर ज्यांची मालकी आहे, अशांनी तहसीलला पुरावे सादर करावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.आधी पुनर्वसन करायाबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनही दिले. त्यात म्हटले की, ६0 ते ७0 वर्षांपासून हे लोक येथे राहतात. शांततामय मार्गाने ते ताबेदार आहेत. घरपट्टी, नळपट्टी भरतात. अनेक दिवसांची वीजबिले आहेत. १९९0 पूर्वीच्या अतिक्रमणांना कायम करण्याचा शासन आदेश आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली या लोकांना थेट बेघर करू नये. आधी त्यांचे पुनर्वसन करावे. नंतरच विकासकामे करावीत, अशी मागणी रासपचे विनायक भिसे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.