शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत ३ रुपयांचा मास्क १५ रुपयांना ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:43 IST

शासनाच्या दरपत्रकानुसार मास्क विक्री न केल्यास संबंधितांवर होणार कारवाई

ठळक मुद्देशासननिर्णयाची माहितीच नाही 

- दयाशील इंगोले

हिंगोली : बाजारात चढ्या दराने मास्क विक्री हाेत असून ४९ रूपये दर असलेल्या एन-९५ मास्क तब्बल ९० ते १०० रूपये एवढ्या चढ्या दराने विकत आहेत. तर डिस्पाेजल मास्कही १० ते १५ रूपयांत विक्री हाेत असल्याचे ‘लाेकमत’ने २९ ऑक्टाेबर राेजी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये निदर्शनास आले. 

हिंगोली शहरातील माेजक्याच मेडिकलवर शासनाच्या दरपत्रकानुसार मास्क विक्री केली जात आहे. काेराेना संकटाचा धाेका अजून संपला नाही. काेराेनाचा संसर्ग राेखता यावा, यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. शासनाने एन ९५ तसेच दाेन व तीन पदरी मास्कचे दर निश्चित केले आहेत. परंतु या मास्कची चढ्या दराने विक्री होते.

नवीन निर्णयाची माहिती...हिंगाेली शहरातील जवाहर राेडवरील एका मेडिकलवर गुरूवारी दुपारी ३ वाजता भेट दिली असता याठीकाणी एन ९५ मास्क ५० रूपये दराने विक्री हाेताना दिसून आले. तर तीन पदरी मास्क ६ रूपये व दाेन पदरी मास्क ५ रूपये दराने विक्री हाेताना दिसून आले. शासनाच्या दरपत्रकानुसारच आम्ही मास्क विक्री करीत आहाेत, असे औषधी दुकानचालकाने यावेळी सांगितले. शासन निर्णयाबाबत माहिती असून शासकीय दरानुसार मास्क विकत आहाेत ,असेही ते म्हणाले. 

दर्शनी भागात नव्हता फलक...हिंगाेली शहरातील महावीर स्तंभ परिसरातील एका औषधी दुकानावर दुपारी ३.४५ वाजता भेट दिली असता याठिकाणी एन९५ मास्क ८० ते९० रूपये दराने तर तीनपदरी १५ रूपये व दाेन पदरी मास्क १० रपये दराने विक्री हाेताना आढळुन आले. विशेष म्हणजे मास्क विक्रीचा बाेर्ड येथेही दर्शनी भागात लावला नसल्याचे आढळून आले. शिवाय शासन दरपत्रकानुसार मास्क विक्रीबाबत येथे बाेर्ड दिसून आला नाही. शिवाय नवीन शासनाच्या दरासंदर्भातही औषधी विक्रेत्यास माहिती मिळते.

दरपत्रकाबाबत माहितीच नाही....हिंगाेली शहरातील माेंढा परिसरातील मेडिकलवर एन९५ मास्क ७० ते ८० रूपये दराने विक्री करताना दिसून आले. दाेन पदरी मास्क १० ते १५ तर तीन पदरी मास्क १५ ते २० रूपये दराने विक्री करताना आढळुन आले. शासनाच्या दरपत्रकाबाबत औषधी विक्रेत्यास माहिती नव्हती, शिवाय दर्शनी भागात मास्क दरपत्रकाचा फलकही लावलेला नव्हता. यावेळी मास्क खरेदीकरिता येणाऱ्या ग्राहकांना वाटेल त्या किमतीनुसार मास्क विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.

तर कारवाई करूहिंगाेली जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी शासनाच्या दरपत्रकानुसारच एन९५, तीन व दाेन पदरी मास्कची विक्री करावी. हिंगाेलीत औषधी दुकानांची २८ ऑक्टाेबर राेजी तपासणी केली. परंतु जादा दराने काेणी मास्क विक्री करताना कोणी आढळले नाही. असे आढळल्यास कार्यवाही केली जाईल. - अन्न व औषध प्रशासन विभाग, बळीराम मरेवाड.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcorona virusकोरोना वायरस बातम्या