हिंगोली : देशामध्ये पेट्रोल-डिझेलसह घरगुती वापराच्या गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस उलटून देखील केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. याचा निषेध करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले.
केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्धवस्त होणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे, परंतु नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे.
महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. असे नमूद करीत सर्व मागण्यांची गांभिर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांवर लादलेले काळे कृषी कायदे मागे घेण्यात यावे आणि वाढती महागाई कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारला सुचना कराव्यात अशा मागणीचे निवेदन करण्यात आले आहे. यावेळी हिंगोली शामराव जगताप,शेख निहाल भैय्या, कृ.उ.बा सभापती दत्ता बोंढारे, अनिल नेनवाणी, माबुद बागवान, विलास गोरे, आरेफलाला, मुजीब कुरेशी, आबेदअली जहागीरदार, राजाराम खराटे, जुबेर मामु, बंटी नागरे, अक्षय डाखोरे, संतोष साबळे, आशिष पुंडगे आदी उपस्थित होते. फोटो नं. २२