शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

५३ क्विंटल तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:04 IST

येथील शांताबाई मुंजाजी दराडे विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आलेला शालेय पोषण आहाराचा ११८ कट्टे तांदूळ काळ्या बाजारात नेताना हिंगोली शहर पोलिसांनी पकडून ६.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देशालेय पोषण आहाराचा माल : मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील शांताबाई मुंजाजी दराडे विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आलेला शालेय पोषण आहाराचा ११८ कट्टे तांदूळ काळ्या बाजारात नेताना हिंगोली शहर पोलिसांनी पकडून ६.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.शालेय पोषण आहाराचा तांदूळ काळ्या बाजारात जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शहरातील औंढा टी पॉर्इंट येथे पोलीस कर्मचारी सुनील अंभोरे, सुनील जयस्वाल, वसीयोद्दीन आदींनी रात्री एकच्या सुमारास टेम्पो क्र. एमएच-२६- एच- ६५९0 हा अडविला. आज सकाळी हा टेम्पो कंत्राटदारच परस्पर लांबवित असल्याची आवई उठली होती. मात्र तपासात हा माल शांताबाई मुंजाजी दराडे विद्यामंदिर शाळेचा असल्याचे समजल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरून टेम्पोचालक संजय ध्रुपत खिल्लारे, शिवाजी परबतराव ढाले व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक गडदे यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला.या टेम्पोतील मालाची पाहणी करण्यासाठी आधी पुरवठा विभागाचे पथकही आले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास मालाची मोजणी सुरू झाली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक मैराळ, पोना दंडगे, अस्लम, शेख शकील, उमेश जाधव, मुजीबुल रहेमान आदींची उपस्थिती होती. हा तांदूळ ५३ क्ंिवटल ७८ किलो एवढा भरला. त्याची किंमत १.४१ लाख एवढी होते. तर टेम्पोची किंमत ५.४0 लाख एवढी आहे. हा एकूण ६.८१ लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. अनेक शाळांत शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिजतच नाही. त्यामुळे पोलिसांची वक्रदृष्टी अशांना महागात पडू शकते.