शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘रात्रवस्ती’ बस उपक्रमाला प्रतिसाद मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:45 IST

रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना अजूनही सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बसमध्येच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र आहे. वाहक-चालकांनासोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या असल्या तरी, प्रत्यक्षात मात्र या उपक्रमाला गावातील सरपंचांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देविभाग नियंत्रक : एसटी वाहक - चालकांच्या आरोग्याचा प्रश्न बनलाय गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना अजूनही सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बसमध्येच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र आहे. वाहक-चालकांनासोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या असल्या तरी, प्रत्यक्षात मात्र या उपक्रमाला गावातील सरपंचांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.एसटी वाहक -चालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दरवर्षी एसटीमधील कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करून कर्मचाºयांवर योग्य उपचार केले जात असले तरी, रात्रवस्ती बसवर कार्यरत वाहक-चालकांची दयनीय अवस्था आहे. ग्रामीण भागात रात्रवस्तीसाठी जाणाºया बसचालक - वाहकांच्या राहण्याची पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सुविधा नसते. तशा तक्रारीही मध्यवर्ती कार्यालयाकडे प्राप्त आहेत. सदर सोयीसुविधा बºयाच ठिकाणी उपलब्ध नसल्याने चालक-वाहकांना पुरेशा आराम मिळत नाही. अपुरी झोप व दिनचर्या सुरळीत होत नसल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबईचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी विभाग नियंत्रकांना परिपत्रकानुसार सूचना दिल्या होत्या. सूचनेप्रमाणे विभागातील आगार व्यवस्थापकांनी रात्रवस्तीसाठी बसेस जात असलेल्या संबंधित गावांना भेटी द्याव्यात. गावातील सरपंच यांच्याशी पत्रव्यवहार करून व विभाग नियंत्रकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी पत्रव्यवहार करावा. शिवाय समक्ष भेटी घेऊन रात्रवस्तीसाठी जाणाºया बसेसच्या चालक वाहकांना राहण्यासाठी तसेच त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, व स्वच्छतागृहाची आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावी. परंतु पत्रव्यवहार करूनही एसटी महामंडळाच्या उपक्रमास प्रतिसाद मिळत नाही. शिवाय गावातील सरपंच याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाहीत. त्यामुळे वाहक -चालकांच्या आरोग्य व सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात टाळण्यासाठी हा नवीन उपक्रम एसटीने हाती घेतला होता.