शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘वीजबिल’ रक्कम जास्त घेतल्यास थेट तक्रार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:17 IST

ग्राहकांना वीजबिल सहजरीत्या भरता यावे, याकरिता महावितरणने इंटरनेटच्या माध्यमातून विविध सुविधा केल्या आहेत. आता यामध्ये वक्रांगी केंद्राची भर पडली असून सदर सेवेचा लाभ घेत वीज ग्राहकांना बिलभरणा करता येणार आहे. जिल्ह्यात एकूण ३५ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्राहकांना वीजबिल सहजरीत्या भरता यावे, याकरिता महावितरणने इंटरनेटच्या माध्यमातून विविध सुविधा केल्या आहेत. आता यामध्ये वक्रांगी केंद्राची भर पडली असून सदर सेवेचा लाभ घेत वीज ग्राहकांना बिलभरणा करता येणार आहे. जिल्ह्यात एकूण ३५ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली सेवा देणाऱ्या वक्रांगी केंद्रामध्ये आता महावितरणची वीजबिले स्वीकारली जाणार आहेत. ही सुविधा मागील एका महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. महावितरणने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत कुठल्याही विभागातील वीजबिले भरण्याची आॅनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता सर्व बिलांचा भरणा केंद्राच्या ठिकाणीच करता येणार आहे. पूर्वी ज्या-त्या विभागातील वीज बिल त्या-त्या भरणा केंद्रावरच भरण्याची सुविधा होती. आता मात्र आॅनलाइन सुविधेमुळे कोणत्याही केंद्रावरून बिल भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात महावितरणच्या वक्रांगीची तब्बल ३५ बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये हिंगोलीत मानका कॉम्पलेक्स बुरूड गल्ली, चित्रालॅब जवळ शिवाजी नगर, तर तालुक्यात समगा, बोराळा, लोहगाव, सिरसम, कनका, माळधमणी, सावरखेडा तसेच कनेरगाव नाका येथील अमृता ड्रेसेस, आखाडा बाळापूर येथील गजानन कंप्युटर, औंढा तालुक्यातील पूर, काकडधाबा, गलांडी, येळेगाव, गोळेगाव तर सेनगाव तालुक्यातील जांभरुन बु. सिनगीनागा, पानकनेरगाव, आजेगाव, वरुड चक्रपान, कोंडवाडा, लिंबाळा, आमदरी, पळशी, आडोळ, कहाकर बु., जयपुर, सुलदली बु. आणि कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ, रेडगाव, वसमत तालुक्यातील हयातनगर आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणtechnologyतंत्रज्ञान