शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

रेशन धान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली ...

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली तालुक्यातील हे चित्र असले, तरी जिल्ह्यातही अशा तक्रारी असल्याचे समोर आले आहे. मात्र, दुकानदार बदलूनही लाभार्थ्यांना दुसऱ्या दुकानातून धान्य मिळण्यास दोन महिने वाट पाहावी लागत आहे.

जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या वतीने गरजूंना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशन दुकानदारांमार्फत धान्य पुरविले जाते. यात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींसह, प्राधान्य कुटुंबातील सदस्य, शेतकरी कुटुंबातील सदस्यांसह पात्र लाभार्थ्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाते. कोरोनामुळे तर शासनाने नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनचे धान्य घेण्यासाठी ई-पॉस मशीनवर अंगठा लावावा लागत असला, तरी अनेक दुकानदार धान्य वेळेवर देत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. वेळेवर धान्य मिळत नसल्याने, तसेच इतर कारणांनी लाभार्थी रेशन दुकानच बदलत आहेत. हिंगोली तालुक्यात जवळपास २५ लाभार्थींनी असे अर्ज तहसीलच्या पुरवठा विभागाकडे सादर केले आहेत.

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागात एक किंवा जास्तीत जास्त दोन रेशन दुकाने आहेत. या दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी रेशनचे दुकान बदलण्याच्या भानगडीत लाभार्थी पडत नाहीत. मात्र, शहरातील लाभार्थी दुकान बदलून देण्यासाठी पुरवठा विभागाकडे तगादा लावत आहेत. सध्याच्या काळात रेशन दुकानदार बदलावयाचा झाल्यास पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी किमान दोन महिने लागत असल्याचे सांगण्यात आले. यात लाभार्थ्यांना दोन महिने लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुकानदार बदलून घेण्यासाठी आलेले लाभार्थी पुन्हा परत जात आहेत.

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोना काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागणार आहे. या काळात लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत जुलै ते नोव्हेंबर, २०२१ पर्यंत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक - १,८८,८७३

अंत्योदय - २६,३५९

अन्नसुरक्षा - १,३१,८३८

शेतकरी - ३०,७७६

हिंगोली तालुक्यात दुकानदार बदलला - २५