शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाधार-उज्वला योजनेकरिता प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:01 IST

शासनाने संकटग्रस्त पीडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना आणि अनैतिक व्यापारास प्रतिबंधसाठी उज्वला योजना राज्यात कार्यान्वित केली आहे.

हिंगोली : शासनाने संकटग्रस्त पीडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना आणि अनैतिक व्यापारास प्रतिबंधसाठी उज्वला योजना राज्यात कार्यान्वित केली आहे. जिल्ह्यातील महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्या संस्थानी सदर योजनेस मान्यता मिळणे बाबत प्रस्ताव सादर केले आहेत, अशा संस्थांनी त्रुटींची पूर्तता करुन अहवाल व ज्या संस्थांना नव्याने प्रस्ताव सादर करावयाचे आहेत त्या संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज ३० नोव्हेंबरअखेर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले.स्वाधारगृह योजनेचा लाभासाठी अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेस महिला व बाल विकास क्षेत्रातील किमान ५ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक आहे. संस्थेचे सनदी लेखापालांनी केलेल्या लेखापरीक्षणाच्या अहवालाच्या मागील तीन वर्षांच्या सत्यप्रती प्रस्तावाच्या सोबत जोडलेल्या असाव्यात. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी, संस्थेच्या नावे किमान १५ लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून असावी. योजना राबविण्याकरिता इच्छुक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी. संस्था नीती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. नीती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा. योजना राबविण्याचे निकष २३ मार्च, २०१८ मधील शासन निर्णयानुसार असावेत.प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वाधारगृहाची क्षमता ३० लाभार्थ्यांकरिता असणार आहे. परंतु मोठ्या शहरांमध्ये ५० किंवा १०० पर्यंत वाढविता येईल. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य शासनाचा राहील. त्रुटी पूर्तता अहवालासोबत नवीन प्रस्तावासोबत संस्थेकडे असणाºया सोयी सुविधांची छायाचित्रे जोडावीत. संस्थेकडे असलेली इमारत रचनाकार (आर्कीटेक्चर) यांनी प्रमाणित केल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडलेले असावे.तसेच उज्वला योजनेचा लाभ घेण्याकरीता पुढील अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक राहील. संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेमध्ये किमान ५0 महिलांकरिता सुविधा उपलब्ध असाव्यात. संस्थेस अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणे या विषयातील किमान ५ वर्षे कामाचा अनुभव असावा. संस्थेचे सनदी लेखापाल यांनी केलेल्या लेखापरिक्षणाचा अहवालाच्या मागील तीन वर्षांच्या सत्य प्रती प्रस्तावाच्या सोबत जोडलेल्या असाव्यात.संस्थेचा वार्षिक ताळमेळ किमान २० लाख रुपये असावा. संस्थेच्या नावे किमान १५ लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून असावी. योजना राबविण्याकरिता इच्छुक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी. सदर संस्थेचे कायमस्वरूपी मुख्यालय किंवा शाखा कार्यालय त्याच जिल्ह्यात असणे आवश्यक आहे. संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. निती आयोगाचे दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा. तसेच योजना राबविण्याचे निकष २७ मार्च, २०१८ मधील शासन निर्णयानुसार असावेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार