शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

२९ गावांतून ३५ अधिग्रहणाचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:53 IST

जिल्ह्यात यंदाही अल्पपर्जन्यमान झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीप्रश्न तीव्र बनत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ गावांतून अधिग्रहणाचे ३५ तर टँकरचे ६ प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात यंदाही अल्पपर्जन्यमान झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीप्रश्न तीव्र बनत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ गावांतून अधिग्रहणाचे ३५ तर टँकरचे ६ प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल झाले आहेत.जिल्ह्यातील २९ गावांमधील जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे हळू- हळू पाणीटंचाईचे संकट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील मोठ्या व लघु प्रकल्पांत अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे बहुतांश गावामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती वाढल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. हे संकट अधिकच गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अधिग्रहणाची मागणी आलेल्या गावांत पाहणी करुन पाण्याची व्यवस्था करुन देणे गरजेचे आहे. अन्यथा तहानलेल्या गावांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. सेनगाव तालुक्यात सध्यातरी पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेले नसल्याने अजून तरी एकाही गावाचा प्रस्ताव पं.स.मध्ये आलेला नाही. मात्र हिंगोली तालुक्यात १४ गावातून १७ प्रस्ताव, कळमनुरी ८ गावातून १२ तर ४ टँकरचे प्रस्ताव. तर औंढा नागनाथ तालुक्यात ६ गावातून ६ आणि टँकरचे २ प्रस्ताव आलेले आहेत.एकंदरीत पाणीटंचाई अनेक गावांत सुरु झाली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मोजक्याच गावात पाणी आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर अनेक ग्रामपंचायती सुस्तावलेल्याच आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याशिवाय पर्यायच नाही.हातपंप बंदच : डिझेल मंजूर होईना ?पंचायत समितीच्या वतीने ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्तीसाठी संबंधित तंत्रज्ञाची नियुक्ती केलेली असते. परंतु गावो- गाव फिरण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसतेच इकडून- तिकडून केली तर त्या वाहनाचे डिझेलच मंजूर होत नसल्याने ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे अनेकगावातील हातपंप दुरुस्तीविनाच राहत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ टळत नाही. त्यामुळे निदान उन्हाळाभर तरी या यंत्रणेसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करुन देण्याची मागणी आहे.जिल्ह्यात हळूहळू पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे अधिग्रहणाच्या प्रस्तावांत वाढच होत चालली असताना पं.स.कडे दाखल झालेल्या प्रस्तावांच्या मंजुरीकडे ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.