दुकानदारांनी मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कुलूप हे नेहमी भारीचे घेणे आवश्यक असून त्यात काटकसर करणे चुकीचे आहे. चांगल्या कंपनीचे कुलूप हे ८५० ते ९०० रुपयांपर्यत येते. तर दुसरीकडे यापाठोपाठ लिंक कंपनीचे १२० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यतचे कुलूप आहे. यामुळे आपल्या मालाची सुरक्षा होऊ शकते. पोटाला चिमटा घ्या, पण दुकानांना कुलूप मात्र मजबुतीचे लावणे आगत्याचे आहे, असे मत कुलूप व्यापारी नरेश नैनवाणी यांनी व्यक्त केले.
सर्वसामान्यांसह अनेकजण घर घेतो महागाचे, आत वस्तूही महागमोलाच्याच असतात. मात्र घराचे कुलूप खरेदी करताना तो काटकसर करीत असतो. त्यामुळे चोऱ्या करणाऱ्यांचे फावते. तेव्हा कुलूप खरेदी करताना दुकानदारांनी कुलूप मजबुत व कंपनीचे खरेदी करावे.
बाजारात दणकट आणि महाग कुुलूपाची १०० टक्के मागणी आहे. कमी दणकट आणि कमी महाग कुुलूपला ५० टक्के दुकानदारांची मागणी आहे. तर अगदी कमी आणि स्वस्त असलेल्या कुलूपाला जास्तीची मागणी ग्राहकांतून आहे, असे कुलूप विक्रेत्याने सांगितले.
शहर वगळता ग्रामीण भागातून येणारे नागरिक मात्र भारीपासूनचे कुलूप पाहतात. मात्र जे कुलूप स्वस्त आहे, दिसायला चांगले आहे, अशा कुलूपांना पसंती देतात, असेही गांधी चौकातील कुलूप विक्रेत्यांनी सांगितले.
वर्षभरात ६ घरफोडी, ४५ चोरी
दुकानांतील मालाची सुरक्षितता ही दुकानमालकांच्या हातात असते. परंतु, बहुतांश दुकानदार हे कुलुप खरेदी करताना बारकाई करतात. अशावेळी चोरांचे फावते. चांगल्या दर्जाची कुलूपे वापरली नसल्यामुळे वर्षभरात हिंगोली शहरात ६ घरफोडी,४५ चोरी झाल्या आहेत. दुकानदारांनी चांगल्या दर्जाची कुलूपे वापरुन दुकानांसमोर चॅनलगेट बसवून आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी.
पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर