शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता जप्तीचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:33 IST

पोलिसांच्या वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झालेल्या पोलीस कर्मचा-याच्या वारसांना भरपाईची रक्कम अदा केली जात नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी दिला आहे. २३ मार्चपर्यंत ही रक्कम अदा न झाल्यास अशी कारवाई होऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पोलिसांच्या वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झालेल्या पोलीस कर्मचा-याच्या वारसांना भरपाईची रक्कम अदा केली जात नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी दिला आहे. २३ मार्चपर्यंत ही रक्कम अदा न झाल्यास अशी कारवाई होऊ शकते.हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथील रहिवासी असलेले विजय कांबळे यांना ६ जुलै २0१७ रोजी पोलीस दलाच्या व्हॅनची धडक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. शासकीय वाहनांना विमा कवच नसते. संबंधित कार्यालयालाच विम्याप्रमाणे भरपाई द्यावी लागते. याबाबत कांबळे यांच्या पत्नी सविता व इतरांनी अ‍ॅड. एस.एस. सूर्यवंशी, अ‍ॅड. डी.बी. चंद्रवंशी यांच्यामार्फत २0१३ मध्ये दावा दाखल केला होता. त्यात अर्जदारास ३८ लाख ६ हजार १५६ रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. गैरअर्जदार तथा हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांनी ही रक्कम न्यायालयात भरणे अपेक्षित होते. मात्र ती २0१७ पर्यंतही भरण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित वारस सविता कांबळे यांनी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यात आता व्याजासह ५३ लाख ३६ हजार रुपये भरावे लागणार आहेत. मात्र हे भरण्यास अजूनही टाळाटाळ सुरूच आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नांदेडच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांची ५ वाहने, संगणक, टेबल, खुर्च्या, आलमारी इ. फर्निचरची जप्ती करण्याचा आदेश दिला आहे. रक्कम जमा न झाल्यास कारवाई अटळ आहे.विशेष म्हणजे विजय कांबळे हेसुद्धा पोलीस कर्मचारीच आहेत. वसमत रोडवर मोटारसायकलवरून जाताना त्यांना व्हॅनने धडक दिल्याने ते दगावले होते. पोलीस कर्मचारी असतानाही पोलीस दलातून मदतीसाठी होणारी टाळाटाळ आश्चर्याचा विषय बनली आहे.ही रक्कम भरण्यास न्यायालयाने आदेशित केलेलेच आहे. ती न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यासही आदेशित केलेले आहे. २३ मार्चला ही कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.