शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

खून खटल्यात मुख्याध्यापकास शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:19 IST

जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथील विद्यासारग विद्यालयातील बहुचर्चित सहशिक्षक संजय क्षीरसागर खून खटला प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक भारत नेमीनाथ साळवे उर्फ गुरू यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ वर्षे सश्रम कारावास व २ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर संस्थाध्यक्ष तुकाराम पाटील जाधव यांची निर्दोष मुक्तता केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथील विद्यासारग विद्यालयातील बहुचर्चित सहशिक्षक संजय क्षीरसागर खून खटला प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक भारत नेमीनाथ साळवे उर्फ गुरू यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ वर्षे सश्रम कारावास व २ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर संस्थाध्यक्ष तुकाराम पाटील जाधव यांची निर्दोष मुक्तता केली.शिक्षण क्षेत्रात हा खून खटला मोठ्या प्रमाणात गाजला होता. तेव्हापासून निर्माण झालेले वाद आजतागायत सुरू आहेत. ८ नोव्हेंबर १९९८ रोजी पगाराच्या कारणावरून हिंगोली येथील नांदेड नाक्यावर दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापक भारत साळवे व तुकाराम पाटील यांनी संगनमताने संजय क्षीरसागर यांचा खून केल्याचा आरोप होता याप्रकरणी सहशिक्षक संजय टाकळगव्हाणकर यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊन सुनावणी झाली. २००१ मध्ये अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने यात भारत नेमीनाथ साळवे यास खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तर तुकाराम पाटील यांना भादंविच्या क. ३२६ अन्वये ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली होती.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात येथे भारत साळवे व तुकाराम पाटील यांनी वेगवेगळी अपील दाखल केली होती. सदर अपिलाची सुनावणी न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे व न्यायमूर्ती ए.एम. ढवळे यांच्या खंडपीठासमोर झाली.न्यायालयाने भारत साळवे यांची खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. पण खुनाच्या बाबतीत कलम ३०४ (१) अंतर्गत दोषी मानून ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा पूर्वी भोगलेल्या कारावासाच्या कालावधीत सुट न देता ठोठावली. तर २ लाख रुपये दंड हा मयत संजय क्षीरसागर यांच्या वारसाला द्यावा, असा आदेश दिला. तर संस्थाध्यक्ष तुकाराम पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. अपिलार्थी यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. त्यास अ‍ॅड. गोविंद कुलकर्णी, अ‍ॅड. निर्मल दायमा, अ‍ॅड. कृणाल काळे यांनी सहकार्य केले. शासनाच्या वतीने अ‍ॅड. विशाल बडाख यांनी काम पाहिले.