शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बिकट वाट ! रस्ता नसल्याने गर्भवती मातेस चक्क खाटावरून नेले रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:48 IST

गर्भवतीस खाटेवर बसवून 3 ते 4 किमी चिखल तुडवत गावाबाहेर आणले.

ठळक मुद्देरस्ताच नसल्यामुळे गावात वाहने येत नाहीत. कळमनुरी तालुक्यातील करवाडी हे गाव आदिवासीबहुल आहे.

हिंगोली :  हिंगोली जिल्ह्यातील करवाडी गावाला  जाण्यासाठी रस्ताच नाही. अन गावात वाहनांची सुविधाही नाही. मागील वर्षानुवर्षपासून येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. आंदोलने केली  पण शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आज परत एकदा एका गर्भवती मातेची हेळसांड झाल्याची घटना घडली  आहे. सदर महिलेस उपचारासाठी रुग्णालयात  दाखल करण्यासाठी चक्क खाटावर उचलून नेण्यात आले.  त्यामुळे जवळपास 3 किमी चिखल तुडवत प्रवास करावा लागला.

सविस्तर माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील करवाडी हे गाव आदिवासीबहुल आहे. गावची लोकसंख्या आसपास  अडीचशे आहे. या ठिकाणी कुठल्याच आवश्यक सुविधा नाहीत. त्यामुळे रहिवाशांना नेहमीच संघर्ष करावा लागतो. बाळंतपणासाठी करवाडी गावी माहेरी आलेल्या सुवर्णा रमेश  ढाकरे  ( 25) या गर्भवती मातेस आज सकाळपासूनच प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात नेण्यासाठी तयारी सुरू केली. परंतु, रस्ताच नसल्यामुळे गावात वाहने येत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी व गावातील लोकांनी सदर गरोदर मातेस रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी चक्क खाटेवर बसवून  3  ते 4 किमी चिखल तुडवित गावाबाहेर आणले.  त्यानंतर काही वेळाने 108 क्रमांकाची रुग्णवाहिका  पोहोचली. त्यामुळे रुग्णवाहिकेद्वारे मातेला पोतरा येथील आरोग्य केंद्रात दाखल  केल्याची माहिती आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर गरोदर मातेवर उपचार सुरू असल्याचे नातेवाईकातून सांगितले जात होते.

यापूर्वीही घटली होती घटनारस्ताच नसलेल्या करवाडी गावात वाहन नसल्याने अडीच वर्षाच्या मुलीला दोन वर्षांपूर्वी झटके येऊ लागल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तब्बल सहा किलोमीटर चिखल तुडवत रुग्णालयात दाखल केले  होते.  त्यामुळे जिल्हाभरातून संतापाची लाट उसळली होती. आदिवासी पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडखे  यांनी कळवाडी गावाला रस्ता  करावा या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने केली 40 किमी पायी चालून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. करवाडी येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा उच्च न्यायालयाने ही दखल घेतली होती परंतु ढिसाळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी येथील रस्ता करायच्या मागणीकडे  लक्ष दिले नाही  आणि दखलही घेतली नाही.  विशेष म्हणजे गावातील लोकांनी रस्ता मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता परंतु रस्ता काही झाला नाही त्यामुळे आज परत एक घटना घडली असून आता तरी प्रशासन जागे होईल का उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHingoliहिंगोलीpregnant womanगर्भवती महिला