शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; ८ लाखांची रोकड सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 14:42 IST

एटीएमच्या पाठीमागील बाजूस भिंतीला लावण्यात आलेले कपाट बाजूला ढकलून एटीएमच्या खोलीच्या मागील बाजूनी आतमध्ये प्रवेश केला.

ठळक मुद्देचाेरट्यांनी एटीएम मशीनचा पत्रा कापण्याचा प्रयत्न केला एटीएम मशीन ऑनलाईन असल्याने हैद्राबाद येथून पोलिसांना तत्काळ संदेश गेला

डोंगरकडा ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न १७ जूनच्या मध्यरात्रीला झाला आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. यामुळे एटीएम मशीनमधील ८ लाखांची रोकड बचावली आहे. 

नांदेड - हिंगोली महामार्गावरील डोंगरकडा फाटा येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. महामार्गावर एटीएम असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक व डोंगरकडा परिसरातील नागरिकांची नेहमीच येथे पैसे काढण्यासाठी गर्दी करतात. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी १७ जून रोजीच्या मध्यरात्री अंदाजे एक ते दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या एटीएमच्या पाठीमागील असलेल्या स्टोअर रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी स्टोअर रूम व इतर ठिकाणी असलेले सीसीटिव्ही कॅमेरे फोडून टाकले, त्यानंतर एटीएमच्या पाठीमागील बाजूस भिंतीला लावण्यात आलेले कपाट बाजूला ढकलून एटीएमच्या खोलीच्या मागील बाजूनी आतमध्ये प्रवेश केला.

चाेरट्यांनी एटीएम मशीनचा पत्रा कापण्याचा प्रयत्न केला, पण एटीएम मशीन ऑनलाईन असल्याने हैद्राबाद येथून आखाडा बाळापूर पोलीसांना सर्तकतेचा संदेश पहाटे साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास मिळाला. यानंतर लगेच सपोनि रविकांत हुंडेकर, पोउपनि हनुमंत नकाते, पोउपनि अच्युत मुपडे, जमादार भगवान वडकिले, शेख बाबर, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज ऐकतात, चोरटे तेथून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या परिसराची पहाणी केली. त्यानंतर हिंगोली वरून श्वानपथक,  फिंगर प्रिंट तज्ञ यांना बोलवून घेण्यात आले. पण यावेळी श्वानपथकला चोरट्यांचा मार्ग सापडला नसल्याने ते परत निघून गेले. नांदेड येथुन एटीएमचे इंजिनिअर संजय आडे, यांनी मशीनची तपासणी केली. एटीएममधून एक रूपयाही चोरीला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :atmएटीएमHingoliहिंगोली