शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात पोलीस वसाहतीचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:56 IST

जिल्ह्यात पोलिसांच्या वसाहतींची समस्या गंभीर आहे. मात्र टप्प्या-टप्प्याने ही कामे होतील. सध्या अडीचशे घरांच्या पोलीस वसाहतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

ठळक मुद्देचिरंजीव प्रसाद : अडीचशे घरांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पोलिसांच्या वसाहतींची समस्या गंभीर आहे. मात्र टप्प्या-टप्प्याने ही कामे होतील. सध्या अडीचशे घरांच्या पोलीस वसाहतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.मागील तीन दिवसांपासून ते हिंगोली जिल्ह्यात वार्षिक तपासणीसाठी आलेले आहेत. आज त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अधीक्षक अरविंद चावरिया उपस्थित होते. यावेळी प्रसाद म्हणाले, जिल्ह्याची एकंदर कामगिरी पाहता समाधानकारक आहे. एम.पासपोर्ट या प्रकारात जिल्ह्याने राज्यात उल्लेखनिय काम केले आहे. जलद गतीने चारित्र्य प्रमाणपत्र दिले जाते. शिवाय आता सायबर क्राईमसाठी नवे अधिकारी रुजू झाले आहेत. त्यामुळे आर्थिक गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांमध्ये त्यांची मदत होणार आहे.ते म्हणाले, जिल्ह्यात पोलीस काका व दिदी हा उपक्रम राबविला जाणार आहे. पोलिस हा जनतेला आपला मित्र वाटला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे ते माहिती देण्यास घाबरणार नाहीत व गुन्हेगारीवरही नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. तर उपाधीक्षक सुजाता पाटील यांनी पोलीस कोठडीत मयत पावलेल्या आरोपीच्या मुलीला दत्तक घेतल्याचे कौतुक करून हा धाडसी व चांगला निर्णय असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी गुन्ह्यांचा आलेखही मांडला. यात १३ जणांना तडिपार केल्याचे सांगून दिवसा घरफोडीच्या १२ पैकी ५ प्रकरणांत तपास लागल्याचे सांगितले. गतवर्षी १२ पैकी २ चा तपास लागला होता. तर रात्री घरफोडीच्या ७१ पैकी १८ घटनांचा तपास लागला. गतवर्षी ६८ घटना घडल्या होत्या. अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे गतवर्षी ५0 यंदा ६७ झाली. विनयभंगाची गतवर्षी ५७ होती. यंदा ८१ झाल्याचे ते म्हणाले. तर आता पोलीस दलातील अधिकाºयांची रिक्त पदे भरली जात आहेत. कर्मचाºयांच्याही जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे काम, ठाणे परिसर व एकंदर कार्यपद्धती सर्वांत चांगली वाटल्याचेही प्रसाद यांनी सांगून पोनि जगदीश भंडारवार यांचे कौतुक केले.