जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार ते हट्टा रस्त्यावर बोरीसावंत पाटीजवळ २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूउपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे.
पूर्णा नदी परिसरातून ढवूळगाव, परळी, माटेगाव आदी भागातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूउपसा सुरू आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होऊनही महसूल विभाग किरकोळ कारवाई करत आहे. मात्र, याठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरूच आहे. याबाबतची माहिती हिंगोली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे बोरीसावंत पाटीजवळ ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असताना ताब्यात घेतला.
ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३८ व्ही ४२२९ हा ट्रॉलीसह अंदाजे किंमत ५ लाख ७५ हजार व एक ब्रास वाळू अंदाजित किंमत ५ हजार असे एकूण ५ लाख ८० हजारांचा मद्देमाल जप्त केला आहे. याबाबत विशाल घोळवे यांनी हट्टा पोलिसांत फिर्याद दिली. आराेपी ट्रॅक्टर चालक दत्ता उत्तमराव दशरथे (रा. परळी, ता. वसमत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थागूनीचे पोलीस जमादार विशाल घोळवे यांनी केली आहे. पुढील तपास जमादार जीवन गवारे करीत आहेत.