शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध देशी दारू विक्री रोखण्यास पोलीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:08 IST

येथील इंदिरा गांधी चौकानजीक मच्छी मार्केटमधील देशी दारुचे दुकान भल्या पहाटेच उघडत असल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त होताच सकाळी आठ वाजता छापा मारला. दहा ते बारा जण दुकानात आढळून आले. पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले असून या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देहिंगोलीत कारवाई : पहाटेच उघडले दुकान

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील इंदिरा गांधी चौकानजीक मच्छी मार्केटमधील देशी दारुचे दुकान भल्या पहाटेच उघडत असल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त होताच सकाळी आठ वाजता छापा मारला. दहा ते बारा जण दुकानात आढळून आले. पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले असून या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.देशी दारूची दुकाने उघडण्यासाठी असलेले नियम अनेकदा पायदळी तुडविले जातात. विशेषत: दारू विक्री बंदच्या दिवशी तर मागचा दरवाजा खुलाच असतो. विशेष म्हणजे काही दुकानदार तर आधीच ठरावीक संख्येत बॉक्स बाहेर काढून ठेवतात. त्यामुळे बंदबारीत तर तळीरामांची अधिक चांगली सोय होते. त्याला जागेवर पोच पार्सलची व्यवस्थाही काहीजण करतात. परंतु मनुष्यबळ उपलब्ध नाही अन् मागील काही दिवसांपासून देशी दारूची विक्री घटत असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभाग कोणतीच कारवाई करीत नाही. यावर पोलीस कारवाई झालीच तर त्यात केवळ कारवाईची शिफारसच करता येते. तर राज्य उत्पादन शुल्ककडून अभय मिळत असल्याने दुकानदार निश्चिंत आहेत. आमदारांनी केलेल्या उपोषणाच्या वेळी तर कारवाई प्रस्तावित केलेल्या दुकानांची यादीच दिली होती. यात पुसेगावच्या मालाबाई सीताराम जैस्वाल, वसमतचे दीपक अमृतलाल जैस्वाल व बालाजी रुखमाजी चेपूरवार, औंढा येथील चंद्रकुमार जैस्वाल, जवळा बाजार येथील लक्ष्मण लोधी, हिंगोलीतील शैलेश जैस्वाल, बी.डी.बगडिया, कमलेश जैस्वाल, कळमनुरीचे नितीन जैस्वाल, सिरसम येथील देवेंद्र बन्सीलाल जैस्वाल, हट्ट्याचे चंदू चेपूररवार, शेख सदलजी शेख मदार, जवळा बाजारचे ओ.ए.परिहार अ‍ॅण्ड पार्टनर, पांगरा शिंदेचे हीरालाल बाबूलाल जैस्वाल यांच्या दुकानांबाबत ही शिफारस केली आहे. यातील काही नावेच चुकीची असल्याबाबत विचारले असता ती राज्य उत्पादन शुल्कने तपासून कारवाई केली पाहिजे, असे सांगण्यात आले.आज सकाळी हिंगोलीत मच्छी मार्केटमधील दुकान वेळेपूर्वीच सुरू झाल्यानंतर केलेल्या कारवाईने पोलीस यंत्रणा आता खºया अर्थाने सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.