शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नहर्त्याच्या मार्गावर खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:03 IST

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून मूर्तीकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून मूर्तीकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहे. सर्वजण गणराय आगमनाच्या जय्यत तयारीत आहेत. मात्र पालिकेकडून पूर्वतयारीला अजून सुरूवात करण्यात आली नाही. शहरात जागो-जागी असलेले खड्डे गणरायाच्या आगमनात अडथळे आणणारे ठरणार असून पालिकेकडून पूर्वतयारीचे नियोजनही नाही, हे विशेष.सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध गणेश मंडळाकडून जय्यत तयारी सुरू आहे. परंतु नेहमीप्रमाणेच गणरायाच्या आगमनावेळी अडथळे आणणाऱ्या खड्ड्यांच्या दुरूस्ती कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही परिस्थिती सर्वत्रच पाहायला मिळते. विशेष म्हणजे हिंगोली शहरातील खड्ड्यांच्या दुरूस्तीला यंदाही अद्याप सुरूवात झाली नाही. २ सप्टेंबर रोजी गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. त्या अनुषंगाने खबरदारी घेत शहरात पूर्वतयारी म्हणून खड्डे बुजविणे, अडथळा करणाºया झाडांच्या फांद्या, स्वच्छता मोहीम यासह विविध कामे पालिका हाती घेते. परंतु ही कामे दरवर्षीच ऐनवेळी केली जातात. त्यामुळे अनेकदा कामे पूर्ण होत नाहीत, किंवा अपुरे राहिल्याने अनेक अडचणींणा तोड द्यावे लागते.विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. शिवाय संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचनाही दिल्या जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र ही कामे वेळेत होत नाहीत. गणेश मूर्ती स्थापनेच्या ऐन दोन दिवसाअगोदर शहरातील दुरूस्ती कामे हाती घेतली जातात. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. याचा फटका गणेश मंडळांना बसतो.हिंगोली शहरालगत नवीन वसाहतीमध्येही गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात स्थापना केली जाते. परंतु त्या ठिकाणी पालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते. अनेक ठिकाणी तर रस्तेच उपलब्ध नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पालिका आता याबाबत कोणते निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सव काळात ज्या काही आवश्यक सुविधा आहेत, त्या वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाभरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे....तर कार्यवाही; पालिकेकडून दुरूस्ती मोहीमगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर नगर पालिकेकडून पूर्वतयारी म्हणून शहरातील रस्ते दुरूस्ती, वीजसमस्या, पथदिवे बसविणे यासह विविध कामे केली लवकरच केली जातील, असे नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवcultureसांस्कृतिक