शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांअभावी अडले तुरीचे चुकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:37 IST

जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.नाफेड केंद्रावर तुरीची खरेदी कमी अन् गोंधळच जास्त होत असल्याने नोंदणी केलेले शेतकरीही शक्यतोर या ठिकाणी तूर खरेदीस घेऊन येत नाहीत. येथे तूर घेऊन आल्यानंतर होणाºया गोंधळाला कंटाळूनच अनेकांनी तर खाजगी बाजारात मिळेल त्या दरात तूर विकली. आजघडीला तूर खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकºयांची नोंदणी झालेली असली तरीही शेतकरी मात्र माल आणताना दिसत नाहीत. सद्यस्थितीत हिंगोली येथील खरेदी केंद्रावर १२३ शेतकºयांची १ हजार ४५६ क्विंटल, सेनगावच्या केंद्रावर २८८ शेतकºयांची ३१९८.५० क्विंटल आणि कळमनुरी येथील केंद्रावर ३६९ शेतकºयांची २९४० क्विंटल, वसमत येथील केंद्रावर २१७ शेतकºयांची १२७३.५० क्विं, आणि जवळा बाजार येथील खरेदी केंद्रावर ३३० शेतकºयांची २ हजार ९२१. ५० क्विंटल अशी एकूण १३२७ शेतकºयांची ११ हजार ७८९. ५० क्विंटल तुरीची खरेदी केल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडून मिळाली आहे. मात्र तूर खरेदी झाल्यानंतरही अनेक कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकºयांना तुरीचे चुकारे देण्यासाठी अडचणी येत आहेत. तूर खरेदी केलेल्या शेतकºयांचे कागदपत्र तपासणी सुरु असून, ते पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर चुकारे टाकण्यात येणार असल्याचे मार्केटींग अधिकारी शेवाळे यांनी सांगितले.नाफेड केंद्रावर तूर विक्री केलेल्या शेतकºयांना कधीच चुकारे वेळेवर मिळत नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे. येथे नेहमीच चुकाºयाची बोंबाबोंब होत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. येथील खेळीमेळी वातावरणामुळेच नाईलाजास्तव खाजगी बाजारात तूर विक्री करण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच येथे वारंवार होत असलेल्या चाळणीमुळे आणि जाचक अटीमुळे तूर विकणेही न परवडणारे झाले आहे.