शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन,रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

ऑक्सिजनची सात टनाची मागणी हिंगोली जिल्ह्यातील सात शासकीय कोरोना हॉस्पिटलसाठी ऑक्सिजनची सात टनांची मागणी आहे. आज जिल्ह्यात टंचाई निर्माण ...

ऑक्सिजनची सात टनाची मागणी

हिंगोली जिल्ह्यातील सात शासकीय कोरोना हॉस्पिटलसाठी ऑक्सिजनची सात टनांची मागणी आहे. आज जिल्ह्यात टंचाई निर्माण होण्याची भीती होती. मात्र, चार टन उपलब्ध झाला. सध्या हिंगोलीत दोन केंद्रांवर चार व तीन टन, वसमत तीन टन, कळमनुरी १ टन तर सिद्धेश्वर व कौठा येथे अर्धा टन ऑक्सिजन उपलब्ध आहे.

पुढे काय : आज रात्रीपर्यंत २७ टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असून तो मिळाल्यास आणखी चार दिवसांची निश्चिंती होणार आहे. तोपर्यंत नवी मागणीही करून ठेवलेली आहे.

रेमडेसिविर : मागणी पाच हजार, एकही मिळेना

सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जिल्हा सामान्य रुग्णालयातही जाणवत आहे. आज शेवटचे ८० इंजेक्शन वापरले. आता साठा संपला आहे. तीन कंपन्यांकडे प्रत्येकी पाच हजार इंजेक्शनची मागणी केली. मात्र, अजून पुरवठ्याबाबत संबंधितांकडून होकार आला नाही.

पुढे काय : राज्य शासनाशी पत्रव्यवहार करून जिल्ह्याला सध्याच्या गरजेनुसार आठवड्याला साडेतीन हजार इंजेक्शनची मागणी केली आहे.

लसीकरण : दोन दिवस पुरेल एवढाच साठा

जिल्ह्यात तब्बल ३९ केंद्रांवरून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ५४ हजार ३७६ लोकांना लस दिली. यापैकी १०६८६ जणांना दुसरा डोस दिला. जिल्हा स्तरावर हजार तर ग्रामीण भागात दोन हजार लसी उपलब्ध आहेत. सर्व ३९ केंद्रे सुरू आहेत. मात्र, पुरवठा न झाल्यास दोन दिवसांनी ते बंद पडतील.

पुढे काय : जिल्ह्याने किमान पाच हजार लसी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली असून दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.

पाठपुरावा सुरू

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होण्यात अडचणी येत आहेत. मात्र, आम्ही सातत्याने पाठपुरावा करून तो मिळवत आहोत. त्यात खंड पडू नये, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी विविध स्टॉकीस्टसह तीन कंपन्यांशी थेट संपर्क सुरू आहे. आज रात्रीपर्यंत एखादी कंपनी किमान दोन हजार इंजेक्शनसाठी राजी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लसींचीही मागणी केली. पुरवठा वेळेत होत नसल्याने इंजेक्शनसाठी मात्र अडचणी येत आहेत.

- रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी